shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कंटेनरच्या अपघातात राळेगण येथिल माय-लेक ठार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक १९ ऑक्टोंबर २०२१.
श्रीगोदा : तालुक्यातील गव्हाणेवाडी येथे नगर – पुणे महामार्गावर दुभाजक तोडून भरधाव कंटनेर दुचाकीवर उलटल्याने कंटेनरखाली दबून झालेल्या अपघातात राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथील आई व मुलगा ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या अपघातात स्वप्नील बाळू मापारी (वय २७) व त्यांची आई लक्ष्मीबाई बाळू मापारी (वय ६२) हे मृत झाले आहेत.
रविवारी सकाळी ६. ३० वाजता पुण्याच्या दिशेने भरधाव जाणारा कंटेनर दुभाजक तोडून नगर रोडवर पलटी झाला. त्याचवेळी शिरूरवरून दुचाकीवर स्वप्नील बाळू मापारी (वय २७) व त्यांची आई लक्ष्मीबाई बाळू मापारी (वय ६२) हे राळेगण सिद्धीला घरी परतत होते. पण अचानक दुभाजक तोडून कंटेनर (एम. एच. ४६ ए. एफ. ०२७२) थेट त्यांच्या अंगावरच पलटी झाला. त्यात बंडू मापारी व लक्ष्मीबाई मापारी हे मायलेक कंटेनरखाली दबल्याने दोघेही ठार झाले.

या अपघातानंतर नगर-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर क्रेनच्या साहायाने कंटेनर बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले. मन हेलावून टाकणारे दृश्य पाहून परिसरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली. अपघाताची माहिती कळताच शिरूरचे पोलीस हवालदार संतोष औटी तसेच त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार दुधाळ, उपनिरीक्षक प्रकाश बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मारुती कोळपे, भाऊसाहेब शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल संपत गुंड यांनी घटनास्थळी दाखल होऊन कंटेनर बाजूला काढून मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close