shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यात महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी.वडापुरी, सुरवड, निंबोडी, भांडगाव, पंधारवाडी, लासुरणे, अकोले, बिजवडी इत्यादी ग्रामपंचायत कार्यालयात जयंती उत्सव साजरा .

इंदापूर तालुक्यात महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी.

वडापुरी, सुरवड, निंबोडी, भांडगाव, पंधारवाडी, लासुरणे, अकोले, बिजवडी इत्यादी ग्रामपंचायत कार्यालयात जयंती उत्सव साजरा .
इंदापूर प्रतिनिधी: (दि२ ऑक्टोबर २०२१) राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त इंदापूर तालुक्यातील विविध ठिकाणी जयंती साजरी करण्यात येत असून यामध्ये वडापुरी, सुरवड, निंबोडी, भांडगाव, पंधारवाडी, लासुरणे, अकोले, बिजवडी इत्यादी ग्रामपंचायत कार्यालयात  जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत त्यांच्या विचारांना उजाळा देत विनम्र अभिवादन केले.

स्वच्छतेची शपथ घेताना म्हणाले की, स्वच्छतेतून नच गावात समृद्धी येण्यासाठी मी माझे गाव अधिक स्वच्छ सुंदर ठेवेन. उघड्यावर कोठेही घाण होऊ देणार नाही. सांडपाण्याचे आणि घनकचऱ्याचे वैयक्तिक स्तरावर व्यवस्थापन करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन .आणि सर्वांना तसे करण्यासाठी प्रवृत्त करेन
. मी ओला कचरा आणि सुका कचरा यांचे घरातच विलगीकरण करेन आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावीन. मी प्लास्टिक मुक्ती साठी सदैव तत्पर राहील वापरा आणि फेका प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू आणि थैल्या वापरणार नाही .मी अशी शपथ घेतो घेते की, माझे घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. ती मी पार पाडीन आणि इतरांनाही यासाठी प्रवृत्त करेल. स्वच्छतेच्या कार्यात मी सदैव योगदान देऊन गाव हगणदारीमुक्त अधिक बनवण्यासाठी आणि त्यात स्वच्छतेचे सातत्य कायम राखण्यासाठी मोलाचे सहकार्य करेल.
निंबोडी ग्रामपंचायत येथे उपसरपंच दत्तात्रय भापकर, माजी सरपंच हनुमंत घोळवे, माजी उपसरपंच रवींद्र भोईत, अंगणवाडी शिक्षिका जगदाळे ताई, ग्रामसेवक शेख कर्मचारी महादेव वाघमारे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
भांडगाव या ठिकाणी सुभाष किसन गायकवाड ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच दत्तात्रय ढुके, कांता सुदाम गायकवाड, बाळासाहेब माने, पांडुरंग जाधव, विजय गायकवाड व ग्रामसेवक पाटील आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत लासुरणे येथे सरपंच सागर पाटील, उपसरपंच उल्हासराव जाचक, अमित चव्हाण सदस्य, निखील भोसले, रामभाऊ निंबाळकर, संतोष लोंढे, दीपक लोंढे सर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत सुरवड येथे सरपंच योगिता शिंदे, माजी उपसरपंच व सदस्य प्रदीप कांबळे, नीरा-भीमा कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी  संचालक साहेबराव घोगरे, चंद्रकांत शेरकर, तात्यासाहेब कोरडकर, बाबासाहेब भोसले, मारुती खोपकर, कल्याण गायकवाड, दशरथ घोगरे, धुमाळ सर, राहुल मोफरकर, धनाजी वाघ इत्यादी उपस्थित होते.
वडापूरी येथे उपसरपंच विठ्ठल कदम तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे, सदस्य अंबिका बागल, संभाजी पवार, उत्तम भाळे,कृष्णदेव खामगळ, महेश देवकर, संजय तोबरे ,नारायण पवार व इतर ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते.
पंधारवडी येथे सरपंच दिगंबर निंबाळकर उपसरपंच किसन भगत सदस्य महेश निंबाळकर व्यंकट भोसले ग्रामसेवक पठाण तलाठी तिकोने कोतवाल पठाण सुनील जगताप ग्रामपंचायत कर्मचारी महेश शिंदे बबन पाडेकर संजय कोकाटे व इतर गावातील  ग्रामस्थ उपस्थित होते.
अकोले येथे सरपंच नकुशा सोमनाथ दराडे, उपसरपंच संदीप शामराव दराडे, ग्रामसेवक सचिन पवार, माजी उपसरपंच वसंत शिंदे ,माजी सदस्य सुरेश दराडे, सोमनाथ दराडे, सुरेश कांबळे ,पोलीस पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
बिजवडी येथे सरपंच दादाराम काळे, उपसरपंच पांडुरंग पारेकर, सदस्य सुधाकर चव्हाण, दादाराम कोकणे, पवन पोंदकुले, माजी सरपंच दिलीप भिसे व इतर ग्रामस्थ आणि ग्रामसेवक शेळके इत्यादी उपस्थित होते.

ग्रामपंचायत कुंभारगाव सरपंच सौ उज्ज्वला परदेशी, ग्रामसेवक सतीश बोरावके, सद्स राहुल भोई, स्वप्नील लोंढे ,ग्रामस्थ रमेश डोळे, संदीप धुमाळ, रमेश नगरे इत्यादी उपस्थित होते.
close