शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
अहमदनगर : गुरूवार ता.१४ ऑक्टोंबर २०२१
श्रीराम चौक ते पुणे बस सेवेला आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या कडून राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेला हिरवा कंदील याप्रसंगी बोलताना आमदार जगताप म्हणाले की,सावेडी उपनगर हे शहराचे सर्वात मोठे उपनगर झाले आहे. या ठिकाणी मोठी लोक वस्ती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सावेडीतील श्रीराम चौक,एकविरा चौक,भिस्तबाग चौक,प्रोफेसर कॉलनी चौक,प्रेमदान चौक,पत्रकार चौक, तारकपूर ते पुणे बससेवा सुरू केली आहे.
अहमदनगर शहरातून दररोज नागरिक आपल्या कामासाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी व आरोग्यसेवासाठी जात असतात सावेडी उपनगरातील नागरिकांची दळणवळणाची गैरसोय होऊ नये साठी दररोज परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू केली आहे.
सदर बस सेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे यांनी पाठपुरावा केला असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी व्यक्त केले. तर यावेळी प्रोफेसर कॉलनी चौकातील सुप्रभात ग्रुपच्यावतीने बस सेवा सुरू केल्या बद्दल आमदार संग्रामभैय्या जगताप व चालक-वाहक यांचा सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते,नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे,मा.नगरसेवक निखिल वारे,सुनील त्रिंबके,बाळासाहेब पवार, विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, अजिंक्य बोरकर,एस.टीचे विभाग नियंत्रक विजय गीते,डेपो मॅनेजर आघाव, शारदाताई लगड,संतोष ढाकणे,गणेश गोरे,राहुल सांगळे,बंटी हिवाळे,योगेश ठुबे,सतीश बारस्कर,शिवाजी पालवे,योगेश पिंपळे,शामराव गोरे,आसाराम निमसे,थोटे काका,राहुल घाणेकर,गणेश उभेदळ, रवी नाईकवाडे,प्रज्वल सोरटे तसेच परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

