गोखळीच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी प्रदीप वाघमोडे तर उपाध्यक्षपदी सचिन बारवकर यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील गोखळी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजी सरपंच सौ. अलका पोळ यांच्या अध्यक्षतेखाली प्रदीप निवृत्ती वाघमोडे यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड केली तर उपाध्यक्षपदी सचिन तुकाराम बारवकर यांची निवड करण्यात आली.
सदर निवड ही त्यांच्या सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय सहभाग आणि गावातील ग्रामस्थांशी सुसंवाद याचा विचार करून निवड केली असल्याची माहिती उपसरपंच सचिन तरंगे यांनी दिली.
यावेळी गोखळीचे सरपंच सौ.अलका बापू पोळ, उपसरपंच सचिन अजिनाथ तरंगे, ग्रामपंचायत सदस्य बापू पोळ, सौ.कावेरी पारेकर, तुकाराम वाघमोडे, बाळासाहेब महानवर, सोमनाथ झगडे , रेखा झगडे सौ. नंदा चितळकर, माजी सरपंच बजरंग राऊत ,सर्जेराव वाघमोडे, राजाराम तरंगे ,माजी उपसरपंच अंकुश वाघमोडे, अमोल मकर ,माऊली वाघमोडे, अशोक अभंग , बाळासाहेब गोफने, गोपाळ शेंडे, जयवंत खरात, राघु पारेकर, दादासाहेब पारेकर, ग्रामसेविका अस्मिता गायकवाड मॅडम, पोलीस पाटील प्रदीप पोळ व गावातील प्रतिष्ठित मान्यवर आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक लिगडे यावेळी उपस्थित होते.

