( माळेगाव येथील बालासाहेब चिरके यांच्या मुलींच्या नावे एक लाखाची बँकेत बचत)
____
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज तालुक्यातील माळेगाव येथील बालासाहेब मधुकर चिरके (वय-३२) यांचे एक्कोणीस आक्टोंबर रोजी निधन झाले. त्यांची कौटुंबिक परिस्थिती गरीबीची असल्याने मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणे कठीण झाले होते.
त्यामुळे पंचायत समितीचे उपसभापती ऋषिकेश आडसकर यांनी सोमवार (ता.२५) रोजी कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन करून एक लाख रूपयांचा धनादेश मयत बालासाहेब चिरके यांच्या पत्नीकडे सुपुर्द केला.
तालुक्यातील माळेगाव येथील बालासाहेब चिरके या तरूण कार्यकर्त्याचे मागील आठवड्यात निधन झाले होते. कुटुंब कर्त्याच्या निधनाने सर्व कुटुंब उघड्यावर पडले होते. त्यांच्या पश्चात असलेल्या वृद्ध आई-वडील, पत्नी, लहान दोन मुली आहेत. या लहान मुलींचे शिक्षण व विवाह यासाठी लागणारा खर्च कसा भागवावा हा अवघड प्रश्न कुटुंबासोबत उभा होता.
त्यामुळे पंचायत समितीचे उपसभापती ऋषिकेश आडसकर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून सोमवारी माळेगाव येथे चिरके कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर मयत बालासाहेब चिरके यांच्या कु. आकांक्षा व अनुष्का या दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी ५० हजार रुपयांची एफडी (फिक्स डिपॉझिट) करण्यासाठी एक लाख रूपयांचा धनादेश पत्नीकडे सुपुर्द केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती लक्ष्मीकांत लाड, पंचायत समितचे माजी सभापती संदीप पाटील, सरपंच कैलास पाटील, संदीप देशमुख, रामरतन धारेकर, संतोष देशमुख, शिवदास थळकरी, सुशील अंधारे, संदीप देशमुख, रवी जाधव, योगेश शिंदे, अंकुश कलाने, माणिकराव गुळवे, अंगद गव्हाणे, चांगदेव गव्हाणे, रामदास गव्हाणे, लालासाहेब भिसे व गणेश भिसे उपस्थित होते आहे.

