shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उशिरा रात्री नागरिकांनी पकडले अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर , एरंडोल तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमी उतरले रस्त्यावर...!


प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल:- तालुक्यातील सर्व वाळूचे ठेके बंद असून सुद्धा रोज रात्री पंधरा ते वीस ट्रॅक्टर व पाच ते दहा डंपर द्वारे खुलेआमपणे अवैध वाळूची वाहतूक होत आहे.
   तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून उत्राण, हनुमंत खेडी, कढोली, टाकरखेडे रवंजे, रिंगणगाव या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरू आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी अनेक वेळा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या उपोषणे केली तरी सुद्धा अवैध वाळू वाहतूक उपसा बंद होत नव्हता वाळू माफियांनी राजरोसपणे हादौस सुरू केल्यामुळे याला पायबंद घालण्यासाठी पर्यावरण प्रेमी मंडळींनी दिनांक 24 10 2019 रोजी उशिरा रात्रीच्या सुमारास हनुमंत खेडे येथून येणारे रीतीने भरलेला ट्रॅक्टर एरंडोल येथे पकडले त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांना घटनास्थळी पाचारण केले. व काही कार्यकर्त्यांनी तात्काळ तहसीलदार सुचिता चव्हाण यांना फोन करून अवैध रेती चे ट्रॅक्टर पकडण्याची माहिती दिली म्हणून तहसीलदार यांनी तात्काळ मंडळ अधिकारी मनोज शिंपी व तलाठी सदानंद मुंडे यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याच्या सूचना केल्या.
  मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तात्काळ अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर एरंडोल पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले. उशिरा रात्रीपर्यंत अरे बाई चे काम सुरू होते. या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या पंचनामे यावर समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन व राजेंद्र चौधरी यांच्या सह्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान प्रशासनातर्फ अवैध वाळूची वाहतूक रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून भरारी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे परंतु हे भरारी पथक फक्त नावालाच दिसून येत आहे.
महसूल, पोलीस प्रशासन, आरटीओ यांच्या संयुक्त पथकाने सुद्धा कारवाई करणे अपेक्षित आहे परंतु समन्वयाचा अभाव यामुळे संयुक्तिक कारवाई होतांना दिसत नाही. यापुढे जर प्रशासन कारवाई करण्यास ठरले तर पर्यावरणप्रेमी मंडळी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूक गौण खनिज यांच्या गोरख धन्याला पर्यावरण दोन पायबंद घालण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही.
ज्या भागामध्ये अवैध वाळू चोरीचे प्रमाण जास्त होत असेल व त्यांच्यावर कारवाई कमी प्रमाणात असेल अशा भागातील मंडळाधिकारी तलाठी यांना कारणे दाखवा नोटीस दिली पाहिजे व जवाई व त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असे पर्यावरण प्रेमी व सुज्ञ नागरिकांचे मत आहे.

close