shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी येथे युगप्रवर्तक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,लोकार्पण सोहळा दिमाखात साजरा..!


शिर्डी । प्रतिनिधी:-

रोजगार निर्मिती करून स्वाभिमान प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा नुकताच शिर्डी येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी अनेक मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
सर्व प्रथम साई बाबांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

सामाजिक कार्यात मार्गदर्शन महत्वाचे आहे. करुणा काळात सर्वांचे हाल झाले, रोजगार बंद पडले आर्थिक मंदी निर्माण झाली. यातून महिलांसाठी  काहीतरी रोजगार निर्माण करावा म्हणून आज दीपावली निमित्त पणती तयार करून या कार्यास शुभारंभ करण्यात आला.

स्वाभिमान प्रकल्प हा लोकार्पण सोहळा आहे असे अध्यक्ष दिलीप दुशिंग यांनी सांगितले. उदमले मॅडम आपल्या भाषणात म्हनाल्या की आपली ओळख ही कामातून झाली पाहिजे. महिलांसाठी रोजगार निर्मिती साठी प्रयत्न करणार , शासनाच्या अनुदानित काही प्रकल्प असल्यास त्या साठी पाठपुरावा करून महिलां सक्षम  करण्यासाठी प्रयत्न करू असे मत त्यांनी मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सो,अलकाताई केदारे, प्रमुख पाहुणे श्रीमती संजयाताई उदमले,नायनाताई शिरसाठ, राजू साळवी ,मुकुंद थोरात,सुरेश शेजवळ,मचिंदर इंगळे, न्यानेश्वर हाटकर, तसेच पत्रकार राजेंद्र दूनबळे, अशोक दुशिंग, राजेंद्र बनकर, राहुल कोळगे,किरण सोनवणे, सह अधिकारी,प्रतिष्ठित नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते महिला मंडळे मोठया संख्येने उपस्थित होते.सूत्र संचालन कु गाथा शिरसाठ हिने केले.
close