नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)
शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते.दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते. दुर्गा देवतेचे माहात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते.
आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून , नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव साजरा केला जातो.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळा मुळे नवरात्र उत्सव साजरा करता आला नाही. या वर्षी जिल्हा प्रशासनाने व राज्य सरकारने देवस्थान बाबतीत नियम शिथिल करण्याची घोषणा केली, त्यामुळे आज विविध ठिकाणी देवस्थान परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते.
नगर तालुक्यातील शिराढोण येथे जगदंबा माता मंदिर आहे. या ठिकाणी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच दहिगाव येथे तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे या ठिकाणी आज घटस्थापना करण्यात आली. या वेळी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सकाळ पासून महिलाची घटस्थापने साठी लगबग सुरू होती. नवरात्र उत्सवात आधी घरोघरी घराची साफसफाई करून घरी मनोभावे घटस्थापना केली जाते.
या नऊ दिवसांच्या कालावधीत मध्ये नऊ दिवसांचा कडक उपवास धरला जातो. या नऊ दिवसांच्या कालावधीत देवी मातेची मोठ्या भक्तिभावाने पुजा आरती केली जाते.
घटस्थापनेच्या आधी अनेक तरुण मंडळे ज्योत आणण्यासाठी मोहटादेवी, बुर्हानगर ,केडगाव, तुळजापूर, अशा साडेतीन शक्तिपीठांपैकी एका देवी मातेची दरबारी जाऊन ज्योत पेटवून ती आपल्या आपल्या गावातील देवी मातेच्य मंदिरा समोरील दिपमाळ ज्योतीच्या साह्याने दिपप्रज्वलन केली जाते. हा नवरात्र उत्सव अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

