shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत हार अन् ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत फेटा न बांधण्याची घेतली पंकजा मुंडे यांनी शपथ..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बीड :  मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गळ्यामध्ये हार घालणार नाही आणि ओबीसीचे राजकीय आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याला फेटा बांधणार नाही, अशी शपथ दसरा मेळव्याच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली.

          सावरगाव इथल्या भगवान भक्तीगडावर विराट दसरा मेळाव्यात बोलताना मुंडे यांनी ही शपथ घेतली. मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वंचितांच्या दारापर्यंत जाऊन झुकून नमस्कार करुन त्यांच्या विकासासाठी झटण्याची शपथ या मेळाव्याच्या माध्यमातून शपथ मी खाते, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
मुंडे म्हणाल्या की, जनतेच्या हितासाठी मराठा आरक्षण असेल, ओबीसीचे राजकीय आरक्षण असेल यावर आज उठवणार आहे. मराठा समाज आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचं कारस्थान सुरु आहे. 

        मराठा समाज शिक्षणाचे आरक्षण मागतो, ओबीसी समाज राजकीय आरक्षण मागतो, दोघांची भांडणं नाहीत, दोघे मिळूनच बहुजन समाज आहे. 
या बहुजन समाजाची वज्रमुठ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मी जो दौरा करणार आहे. त्या दौऱ्यात मराठा समाज, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना मिळणार मदत, शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि मजूर, महिलांची सुरक्षा हे घेऊन मी दौरा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे  अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close