shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुंबईतील अद्वैत वागधरे यांचे अलिबाग सायकल क्लब कडून जोरदारपणे स्वागत आणि पुढील प्रवासाला शुभेच्छा..!!

राजेश बाष्टे अलिबाग प्रतिनिधी:-

अद्वैत वागधरे हा कांदवली, मुंबई चा तरुण, मुंबई ते गोवा एकटाच सायकलने निघाला आहे. याची खबर  काल संध्याकाळी अचानक मकरंद नाईक याना समजली  याबद्दल त्यांनी आपल्या क्लब मधील सदस्यांना ही माहिती दिली. आणि त्या बरोबरच त्याला शुभेच्छा देण्यासाठी सकाळी भेटूया असे आवाहनही केले.  

सकाळी पावणे सहा वाजता उत्साहाने ओसंडून वहाणारे अलिबाग सायकल क्लब मधले नेहेमीचेच सायकल प्रेमी ठरलेल्या ठिकाणी हजर होते. अलिबाग सायकल क्लब च्या वतीने अद्वैत चे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गेले आणि 11 सायकल वीर नागाव च्या दिशेने रवाना झाले. काहीजण सहान बायपास मार्गे परत आले तर काहीजण त्याला अलिबाग तालुक्याच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे साळाव पर्यंत साथ देऊन तिथून मागे फिरले.



अद्वैत सारखे सायकल वीर अनेकांना प्रेरणा देत असतात. यापासून प्रेरणा घेऊन अलिबाग मधूनही कोणीतरी असा काही साहसी प्रवास लवकरच करतील अशी आशा आहे*.

*मोटारसायकल आणि सायकल यामध्ये सर्वात मोठी तफावत काय असेल तर मोटारसायकलीमुळे प्रदूषणात भर पडते; पण सायकल चालविण्यामुळे पर्यावरणाचे काहीच नुकसान होत नाही. शिवाय सायकलमुळे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. अलिबाग मधील युवकांना रायडिंगची आवड आहे. त्यांच्या या आवडीचे खेळात रुपांतर झाले तर सायकल रायडिंगमध्ये चांगले खेळाडू तयार होऊ शकतात, असा विचार आता पुढे येऊ लागला आहे. यासाठी अलिबाग मधील  तरुणांचा अलिबाग सायकल क्लब काम करत आहे. तरुणांना  योग्य मार्गदशन मिळावे, यासाठी सायकल क्लब प्रयत्न शील आहे असे मकरंद नाईक यांनी याप्रसंगी सांगितले तर अनिरुद्ध आठवले यांनी आभार मानले*
close