shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरीतील १३४ बालकांच्या बाल संगोपन योजनेला मंजुरी- आप्पासाहेब ढुस..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार,२७ ऑक्टोबर , २०२१
राहुरी: अहमदनगर जिल्हा कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या विनंतीस मान देऊन राहुरी तालुक्यातील कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी महिला व बाल विकास विभागाचे वतीने राहुरीत  शिबिर आयोजित केले बद्दल व तालुक्यातील १३४ बालकांना बाल संगोपन योजना मंजूर केल्या बद्दल जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष मा. हनिफ शेख सर व समस्त टीमचे कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे वतीने हार्दिक आभार. 
     आजच्या शिबिराची माहिती मिळू शकली नाही असे व ज्यांचे कागदपत्र पूर्तता होऊ शकली नाही अश्या तालुक्यातील उर्वरित बालकांसाठी पुन्हा राहुरीमध्ये  शिबीर आयोजित करण्याबाबत  जिल्हा बाल कल्याण समितीला कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका समन्वयक आप्पासाहेब भिमराज  ढुस व प्रशांत सुधाकर कराळे यांनी लेखी पत्र देऊन मागणी केली आहे. 
जण हितार्थ जारी..
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close