shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आत्मनिष्ठ युवती मंडळ व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भुलाबाई महोत्सव साजरा...!,


प्रतिनिधी । एरंडोल
 एरंडोल: - तालुक्यातील खर्ची बु गावातील आत्मनिष्ठ युवती मंडळाच्या वतीने भुलाबाई महोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी नानाभाऊ महाजन (जि.प. तथा नियोजन मंडळ सदस्य) यांची प्रमुख उपस्थिती होती. 
या कार्यक्रमात खर्ची बु गावातील उच्चशिक्षित मुलींचा सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात सामुहिक नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा अशा विविध कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी विदयार्थ्यांना सन्मान चिन्ह व सहभागी प्रमाणपत्र (सर्टिफिकेट )देऊन गौरवण्यात आले.
यावेळी जि प सदस्य नानाभाऊ महाजन म्हटले कि, आज आपण आपल्या आजुबाजूच्या समाजाचे निरिक्षण केले तर आपल्या लक्षात कि प्रत्येक क्षेत्रात महिला हया घरच्या सगळ्या जबाबदारया सांभाळत आपली नविन ओळख निर्माण करत आहेत. तसेच आता महिला देखील संरक्षण (difencs) क्षेत्रात काम करू शकणार आहेत.
 आत्मनिष्ठ युवती मंडळाच्या वतीने सुमारे पंचवीस मुलींनी आणि १०० पेक्षा जास्त महिलांनी या कार्यक्रमात आपणहून सहभाग नोंदविला. 
खर्ची गावात तीन मुलींनी वकिली चे शिक्षण पुर्ण करून गावाचे नाव रोशन केलय. तसेच काही मुलींनी कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजीक कार्य, अभियांत्रिकी, वैद्यकीय इ. विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले आहे. तसेच काही मुलींनी आपले शिक्षण पूर्ण करून आता वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करत आहेत.
याप्रसंगी आत्मनिष्ठ युवती मंडळाच्या अध्यक्षा स्वाती माळी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच या कार्यक्रमात सरपंच,आशाबाई माळी, उपसरपंच,योगेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य,दगडु  माळी, शोभाताई माळी, बापू माळी ग्रामस्थ,नेहरु युवा केंद्राचे समन्वक मुकेश भालेराव, तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष उत्तम माळी. आणि गावातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

close