shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१ शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांना जाहीर...!


पद्मश्री डॉ विजयकुमार शहा यांच्या हस्ते दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी पुणे येथे सन्मान...!
नगर । मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट)
संस्थेच्या 21 व्या वर्षातील गुणिजन गौरव महापरिषद पुरस्कार निवड समितीने
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष,शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील
यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१या पुरस्काराचे मानकरी म्हणुन जाहीर केले आहे. पद्मश्री डॉ विजयकुमार शहा यांच्या हस्ते दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात पुरस्कार प्रदान होणार आहे. 

शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम शिवश्री राहुल ढेंबरे पाटील करत आहेत. 
गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यात यावे व गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सह्यांची मोहीम, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी-कष्टकऱ्यांचे झालेले नुकसान, विजेसंदर्भातील 
नविन विज कनेक्शन, सौर क्रुषी पंप योजना, ट्रांसफार्मर संदर्भातील अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम,छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीउत्सवानिमीत्त भव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन दरवर्षी केले जाते.


विद्यार्थ्यांचे शैक्षणिक/दळणवळण विषयक प्रश्नासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिबीराचे आयोजन,  ग्रामीण भागातील पाणी,रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात नेहमी अग्रेसर भूमिका. जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेण्याचे काम, कोविड महामारीतही रुग्ण व नातेवाईकांना मदतीचा हात देण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने करत महाराष्ट्र राज्याचे विद्यमान आरोग्य राज्यमंत्री मा.ना.राजेंद्रजी पाटील-यड्रावकर यांनी देखील शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. 

ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील हा युवातरुण सामाजिक शिवकार्य, शांत-संयमी, सामाजिक प्रश्नांची जाण असल्यामुळे थोरामोठ्यांच्या गळ्यातील ताईत बनला असुन  तरूण पिढीसाठी एक आदर्श असाच आहे.

शिवश्री राहुल बाजीराव पा. ढेंबरे  यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१  जाहीर  झाल्यानंतर विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी समाजमाध्यमांतुन शुभेच्छा दिल्या आहेत.
(शब्दांकन-शिवश्री.हौशीराम मिंडे पाटील, राज्य संघटक, शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य)

आई-बाबा, कुटुंबातील सदस्य, शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेतील माझ्या बंधुभगिनींचा, वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा सन्मान समर्पित...आतापर्यंत केलेल्या सामाजिक शिवकार्याची पावती मिळाली.
यामुळे प्रेरणा आणि सामाजिक शिवकार्यासाठी आणखी बळ मिळाले...!

राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१  पुरस्कारासाठी निवड करणार्या निवड समितीचे ऋण व्यक्त करतो.
-शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील,
संस्थापक / प्रदेशाध्यक्ष,
🚩शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य🚩
मो.9579745774
close