सीईटी परीक्षेत ९७.५० टक्के मार्क मिळवून कु. भाग्यश्री सातपुते डॉक्टर कदम गुरुकुल मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरात सातपुते वस्ती येथील डॉक्टर कदम गुरुकुल कॉलेज मध्ये इयत्ता बारावी सीईटी परीक्षेमध्ये ९७.५० टक्के मार्क मिळवून कुमारी भाग्यश्री रामदास सातपुते या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यशस्वी झाली. सीईटीचा निकाल २७ ऑक्टोबर २०२१रोजी झाला असून तिच्या यशस्वीते बद्दल सर्व स्तरातून विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
भाग्यश्री सातपुते ही सातपुते वस्ती जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी असून माध्यमिक शिक्षण नारायणदास हायस्कूल येथे केले आहे. तसेच अकरावी व बारावी डॉक्टर कदम गुरुकुल याठिकाणी केले आहे .भाग्यश्री सातपुते यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, माझ्या यशामध्ये माझे शिक्षक आई-वडील आणि परिवारातील सदस्य यांचा मोलाचा वाटा आहे. माझ्या शिक्षणासाठी सदैव सर्वांनी सहकारी केली त्यामुळे त्यांच्या प्रेरणेतून आज यश मिळू शकले यानंतर मी यशस्वी डॉक्टर होऊन सर्वांची सेवा करण्याचा प्रयत्न करील अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

