जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाॅटसॲप - ९७६८४२५७५७
मुंबई । प्रतिनिधी :-
मा. जयंत पाटील म्हणाले,‘‘दादांना हे नक्की माहीत आहे की सोन्याचा मुकुट कोणालाच द्यायची वेळ येणार नाही. त्यामुळे ते जोरात घोषणा करीत आहेत. वेळ आली की त्यांना ते कळेलच. विरोधकांचा एकेरी उल्लेख करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही. मात्र सत्ता गेली की लोक भ्रमिष्ट तरी होतात किंवा त्यांचा तोल तरी जातो.
दादांबाबत नेमके काय झाले, याचे संशोधन व्हायला हवे. ते ज्यांना नेते मानतात, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार साहेबांचे बोट धरून राजकारणात आल्याचे जाहीर पणे सांगितले आहे. मोदींच्या बाबतीतही असा एकेरी उल्लेख ते खासगीत करीत असावेत.
पेट्रोल-गॅसची दरवाढ लस फुकट दिल्यानेच करावी लागल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत. यावर टीका करताना जयंत पाटील यांनी लस जनतेच्या खिशातून पैसे काढून लस दिली आहे. तीच लस फुकट दिल्याची जाहिरात मात्र भाजप मोदींचे फोटो लावून केली जात आहेत. शेतकरी, वाहनधारक, गरीब गृहिणी यांचे पैसे इंधनदर वाढीतून काढून घेतल्याचेच ते मान्य करीत आहेत.

