निमगाव केतकी येथील बेमुदत धरणे आंदोलनास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संजय सोनवणे यांनी दिले पाठिंब्याचे पत्र.
बहुजन परिषद, प्रहार जनशक्ती पक्ष, शिवशाही शेतकरी संघटना यांचा धरणे आंदोलनास पाठिंबा.
इंदापूर प्रतिनिधी:जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी महामार्ग क्रमांक ९६५ जी हा इंदापूर – बारामती राज्य महामार्गावरील निमगाव केतकी येथील शेतकऱ्यांच्या शेतातून जात असून हा परस्पर रिअलायमेंट (पर्यायी मार्ग) रद्द करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी शुक्रवार दिनांक १५ ऑक्टोबर पासून विजयादशमीच्या मुहुर्तावर निमगाव केतकी गावात बेमुदत धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबलाय. त्या ठिकाणी दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी सदर शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन पत्र दिले.
यावेळी त्यांनी सदर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभा असून आजही शेतकरी गेली पाच दिवसापासून धरणे आंदोलन करीत असून प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालून निमगाव केतकी येथील या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. संबंधित प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना पत्रव्यवहार द्वारे कळवून व प्रत्यक्ष भेटून यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या ठिकाणी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या प्रत्येक बाजूचा विचार करून त्यांनी सविस्तर माहितीद्वारे कशा पद्धतीने यावरती तोडगा काढला पाहिजे याबद्दल सविस्तर मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सर्जेराव जाधव, संदीप भोंग, तात्यासाहेब वडापुरे, बाबासाहेब भोंग,ॲड. सचिन राऊत,कुलदिप हेगडे, सचिन चिखले, मच्छिंद्र आदलिंग, भारत बरळ, अमोल राऊत, म्हसुदेव वडापुरे ,नवनाथ आदलिंग यांच्यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने याधरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.
प्राधिकरणाने चालू रस्ता शंभर फूट असताना देखील ७० फूट दाखवून दिशाभूल केली आहे. असा आरोप आंदोलकांनी केला असून चालू रस्त्याच्या दक्षिण बाजुने असणार्या जुन्या रस्त्यांचा विचार केलेला नाही. बाह्यावळण करू नये असा १५ ऑगस्ट २०१७ चा ग्रामसभेचा ठराव प्राधिकरणास सादर केलेला आहे. गुगल अर्थ नकाशानुसार रस्ता ३६०० मीटर लांबीचा दाखविला आहे व रिअलायमेंट रस्ता पंधराशे १५६० मीटर लांबीचा दाखवन्यात आलाय.शिवाय चालू रस्त्याचे अंदाजपत्रक ६४ कोटी ४ लाख रुपये व रिअलायमेंट रस्त्याचे ३९ कोटी ८२ लाख दाखवून दिशाभूल केली आहे.असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
दरम्यान या बेमुदत धरणे आंदोलनास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सदर ठिकाणी भेट देऊन आपण शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे सांगितले. तसेच बहुजन परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बिभीशन लोखंडे,कार्याध्यक्ष दत्ता बाबर तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष संजय राऊत यांनी भेट देऊन आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन स्थगित नाही…
प्राधिकरणाने २८ मार्च २०१८ रोजी च्या प्रत्यक्ष वस्तुस्थिती च्या अहवालामध्ये चालू रस्ता २० ते २५ मीटर रुंद दाखवून चुकीचा अहवाल पाठवलेला आहे.मोजणीच्या नोटिसा काढून दडपशाही केली जात आहे.यासाठी सक्षम प्राधिकारी तथा प्रांताधिकारी आणि ८ मार्च २०१८ रोजी बाधित होणारे शेतकरी, अल्प भूधारक व मध्यम भूधारक आहेत. चालू रस्त्यावर अंडरपास करावा असा स्वयंस्पष्ट अहवाल दिलेला आहे.प्राधिकरणाने अधिनियमातील तरतुदी चा भंग करून २७ मार्च २०१८ ची अधिसूचना कार्यवाही विना रद्द करून २७ जानेवारी २०२१ ची अधिसू्चना जारी करून दडपशाही चालवलेली आहे. तरी सक्षम प्राधिकारी यांनी १७ ऑगस्ट २०२१ च्या निकाल पत्रामध्ये सुनावणी दरम्यान मांडलेल्या मुद्द्यांचा खुलासा केलेला नाही. तसेच सदर निकाल पत्रामध्ये प्राधिकरणाने केलेला खुलासा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आहे हे निकालपत्र आम्हा शेतकऱ्यांना मान्य नाही. अशा पद्धतीचा मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत.त्या मान्य झाल्याशिवाय हे बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही असेही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले.

