जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने
मिशन कवच कुंडल अभियानांतर्गत टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर यांच्या वतीने लसीकरण मोहीम.
इंदापूर प्रतिनिधी:जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने इंदापूर येथील टिपू सुलतान नगर (प्रभाग क्रं ७) येथे इंदापूर नगरपालिका यांच्या मिशन कवच कुंडल अभियानांतर्गत टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर यांच्या वतीने लसीकरण मोहीम(१९ ऑक्टोबर) रोजी राबविण्यात आली असल्याची माहिती टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर ग्रुपचे फिरोज खान पठाण यांनी दिली.
.. यामध्ये परिसरातून मोठ्या प्रमाणात लसीनकरणास प्रतिसाद मिळाले असून इंदापूर नगरपालिका चे नगरअध्यक्ष अंकिताताई शहा यांच्या हस्ते लसीकरणास सुरवात करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहरच्या वतीने करण्यात आले होते..यावेळी उपजिल्हा रुग्णालय मधील परिचारिका डॉ.वृषाली नवगिरे डॉ.चारुमला पेटकर सागर भोंग, नंदलाल गवळी
सागर भोंग, सुमित वाघमारे व इंदापूर नगरपालिकाचे अलताफ पठाण , पुंडे यांनी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

