shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल तालुका दक्षता समितीची बैठकीत नवीन रेशन कार्ड धारकांसाठी धान्य मिळावे म्हणून, तालुक्यात धान्याच्या इष्टांक वाढवा म्हणून शासनदरबारी सर्वतोपरी प्रयत्न करणार-आमदार चिमणराव पाटील-


                   प्रतिनिधी । एरंडोल

फोटो ओळ :-तालुका व नगरपालिकास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत उपस्थित आमदार चिमणराव पाटील, तहसीलदार सुचिता चव्हाण, व इतर समितीचे सदस्य.




एरंडोल :- समाजातील गोरगरीब गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळेल याकडे दक्षता समितीच्या सदस्यांनी लक्ष द्यावे तसेच नवीन रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना धान्य मिळावे म्हणून तालुक्यातील धान्याच्या इष्टांक वाढवण्यासाठी दरबारी सर्वतोपरी पाठपुरावा असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी दक्षता समितीच्या सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीतीची बैठकीत संपन्न झाली यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार चिमणराव पाटील म्हणाले की तळागावातील गोरगरीब गरजू यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यात यावा तसेच ज्या आदिवासी नागरिकां जवळ रेशन कार्ड नाही अशा नागरिकांना नवीन रेशन कार्ड बनवून देण्यासाठी मोठा कार्यक्रम घेण्यात येईल तसेच नवीन रेशन कार्ड धान्य मिळवण्यासाठी तालुक्यातील धान्याच्या इष्टांक वाढवण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करून लाभार्थ्यांचे रेशन सुरू करण्यात येईल. असे आमदार चिमणराव पाटील यांनी तालुकास्तरीय व नगरपालिका स्तरीय दक्षता समितीचे सदस्य, रेशन दुकानदार , यांच्या बैठकीत ते बोलत होते.
तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या त्यांना वाटप होणारे धान्य, धान्य वितरणात येणाऱ्या अडचणी यांची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी जाणून घेतली.
 यावेळी दक्षता समितीचे सचिव  तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी सांगितले की जरी नवीन रेशन कार्डधारकांना धान्य मिळत नसेल अशा नागरिकांच्या शासनातर्फे दिल लाख रुपयाच्या आरोग्य विमा काढण्यात आला आहे.
दरम्यान तालुकास्तरीय व नगरपालिकास्तरीय समितीचे अध्यक्ष चिमणराव पाटील यांच्या हस्ते सर्व सदस्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तहसीलदार सुचिता चव्हाण चिमणराव पाटील यांचेसह सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी समितीचे सदस्या मनीषा चौधरी, मंदकिनी भावसार, सुरेखा महाजन, कल्याणी पाटील सदस्य ज्ञानेश्वर बडगुजर, देवानंद ठाकूर, हरीश पांडे, परेश बिर्ला, चंदू जोहरी, राजेश झांबरे अतुल ठाकूर, कुणाल पाटील,रविंद्र चौधरी या वेळी उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हरीश पांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी केले, पुरवठा अधिकारी संदीप निळे, ज्ञानेश्वर राजपूत, नंदकिशोर वाघ यांनी परिश्रम घेतले.

close