shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समन्वय समितीच्या बैठकीत गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचा ठराव करा :- आमदार चिमणराव पाटील....! सौर ऊर्जेच्या लाभ घेण्यासाठी एरंडोल व पारोळा तालुक्याच्या समावेश करा..... !!

प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- येथे पंचायत समिती सभागृहात आमदार चिमणराव पाटील यांच्या उपस्थितीत व समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या आढावा घेण्यासाठी समन्वय समितीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती.  या आढावा बैठकीसाठी 29 शासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यापैकी निम्मे अधिकाऱ्यांनी या बैठकीस दांडी मारली होती. बैठकीत आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये चार विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले प्रतिनिधी पाठवले होते.
फोटो ओळ:- एरंडोल येथे समन्वय समितीच्या बैठकीत आमदार चिमणराव पाटील यांचा सत्कार करताना अध्यक्ष रमेश महाजन, उपस्थित नाना महाजन, महानंदा पाटील, वासुदेव पाटील, अनिल महाजन, मिनाबाई चौधरी छायाबाई निंबाळकर

या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार म्हणाले की आजच्या या समन्वय समितीच्या बैठकीस गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी असा ठराव करण्याचे आदेश तहसीलदार सुचिता चव्हाण यांना देण्यात आले.समन्वय समितीची मीटिंग घेण्याच्या उद्देश नागरिकांसाठी शासनातर्फे देण्यात येणाऱ्या योजनां ह्या फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे व व त्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे तसेच प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने या बैठकीत आढावा देणे व हजर राहणे आवश्यक आहे.शासनातर्फे फक्त एरंडोल व पारोळा तालुका सौर ऊर्जेबाबत वगळण्यात आला आहे. या दोन्ही तालुक्यांना सौरऊर्जेच्या लाभ घेण्यासाठी समाविष्ट करण्यात यावे असा ठराव करण्यात आला.महावितरण कंपनीचे इंगळे यांनी सांगितले की दारिद्र रेषेखालील नागरिकांना 500 ₹ भरून घरगुती वीज कनेक्शन देण्याचे सुरू आहे. ज्या नागरिकांची नापीक जमीन असेल त्या ठिकाणी वीज वितरण कंपनी ती शेतजमीन भाडेतत्त्वावर घेऊन त्या ठिकाणी सोलर प्लांट उभे करणार आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी घरी वीज वापरण्यासाठी आपल्या घराच्या गच्चीवर सोलर प्लांट बसवून घ्यावी त्यावर वीज वितरण कंपनी 40% अनुदान देत आहे.तालुका कृषी अधिकारी बोरसे यांनी सांगितले कीअतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान आचे सरसकट पंचनामे करण्यात येत आहे. पिक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन पंचनामे सुरू आहेत.यावेळी आमदार पाटील म्हणाले की एकही शेतकरी पिक विमा पासून वंचित राहता कामा नये.फळबागाचे सुद्धा पंचनामे करून त्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे.समन्वय समितीच्या बैठकीसाठी तालुक्यातील नागरिक शेतकरी व पदाधिकारी हे काही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत असल्यामुळे त्यांची तारांबळ उडताना दिसत होती तर काही अधिकाऱ्यांनी आपले प्रतिनिधी पाठवल्यामुळे नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना देता येत नव्हती. अशा प्रतिनिधींना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आपल्या विभागाची पूर्ण माहिती असल्याशिवाय येऊ नये व पुढच्या बैठकीसाठी तुमच्या अधिकाऱ्यांनाच पाठवा असा सल्ला देण्यात आला.   समन्वय समितीचे सचिव तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या तर्फे आमदार चिमणराव पाटील, समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,सदस्या महानंदा पाटील, मिनाबाई चौधरी, छायाबाई निंबाळकर, सदस्य घनश्याम पाटील, रवींद्र पाटील, दत्तात्रय पाटील, यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन तालुका प्रमुख वासुदेव पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी प्रभारी सभापती अनिल महाजन, उपसभापती विवेक पाटील, माजी सभापती मोहन सोनवणे, उपतालुका रवींद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर,गबाजी पाटील, सरपंच सचिन पाटील, विनोद पाटील, उमेश पाटील, ईश्वर पाटील, राजेंद्र पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन, कुणाल पाटील, यांचेसह विविध गावातील नागरिक शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
close