shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केंद्र सरकार महावितरणचे करणार खाजगीकरण..? ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक १९ ऑक्टोंबर २०२१.
 अहमदनगर :  ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘राज्यावर कोळशाच्या तुटल्यामुळे लोडशेडिंगचं संकट येत असताना केंद्र सरकार महाविरतणचे खाजगीकरण करण्याची तयारी करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे, असं ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं.

 
राज्यात वीज तुटवड्याचा प्रश्न चव्हाट्यावर आलेला असतानाच आता नागरिकांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार महावितरणचं खाजगीकरण करण्याच्या विचारात असून, तशी दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.


 
         याविषयी अधिक माहिती देताना तनपुरे म्हणाले, ‘महावितरणचे खाजगीकरण होऊ शकते अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. मला भिती वाटतेय, कारण जर असं झालं आणि एखादा खाजगी वीज वितरण करायला बसला, तर तो शेतकऱ्यांकडे दुष्काळ आहे; ओला दुष्काळ पडलाय हे जर न बघता सरसकट जुल्मी वसुली त्याने केली तर मोठे अवघड दिवस शेतकऱ्यांवर येतील’, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.गॅसवरील वीज निर्मिती प्रकल्पांसाठी करारानुसार गॅस मिळत नसून, फक्त ३० टक्केच गॅस पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. या संकटात भर म्हणजे ज्यांच्याशी दीर्घकालीन करार केलेले आहेत अशा कंपन्यासीजीपीएल आणि जेएसडल्बू यांनी स्वस्त वीज पुरवठा बंद केलेला आहे. त्यामुळे १ हजार मेगावॅट विजेचा पुरवठा त्यांच्याकडून केला जात नाही. या कंपन्यांनी वीज निर्मितीच बंद ठेवली आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली होती.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close