shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपुरातील गंठण चोरांची टोळी पकडली;दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त-अहमदनगर एलसीबीची कार्यवाही..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १९ ऑक्टोंबर २०२१.
 श्रीरामपूर - नगर एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सोपान गोरे ,हवालदार विजयकुमार वेठेकर ,संदीप पवार ,पोलीस नाईक शंकर चौधरी ,विशाल दळवी ,रविकिरण सोनटक्के ,दिपक शिंदे तसेच पोलीस शिपाई योगेश सातपुते व चालक हवालदार संभाजी कोतकर यांच्या पथकाने कोपरगाव, राहाता ,लोणी भागात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणारी टोळी श्रीरामपुरात पकडली आहे .
           आरोपी ०१)नागेश राजेंद्र काळे ,वय 20 वर्ष ,राहणार -वडाळा महादेव,तालुका श्रीरामपूर ०२) सोंड्या उर्फ आदित्य गणेश पिंगळे,वय 19 वर्ष,राहणार- अशोक नगर ०३)संदीप दादाहरी काळे,वय 32 वर्षे,राहणार -वडाळा महादेव अशांना श्रीरामपूर मधून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व दोन मोबाईल असा एकूण दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपींवर कोपरगाव,राहता व लोणी पोलीस स्टेशनला अनेक जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.    
              नमुद कारवाई नगर पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील,अपर पोलिस अधीक्षक श्री.सौरभ कुमार अग्रवाल, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे,श्रीरामपूर डीवायएसपी श्री. संदीप मिटके,शिर्डी डीवायएसपी श्री.संजय सातव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली नगर स्थानिक गुन्हे शाखेने केली.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close