खुळे चौक येथील सुशोभीकरणाच्या कामांमध्ये फेर रचना करण्यात यावी.. सार्वजनिक बांधकाम उपविभाग इंदापूर यांना इंदापूर काँग्रेस पक्षाचे निवेदन.
खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत अन्यथा काँग्रेस त्यात वृक्षारोपण करेल.. इंदापूर नगरपरिषदेला इंदापूर काँग्रेस पक्षाने दिले निवेदन.
इंदापूर प्रतिनिधी: (६ ऑक्टो२०२१)इंदापूर शहर येथील महत्वाचे ठिकाण असलेले खुळे चौक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रस्तावित असलेले सुशोभीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने रचना करून करीत असल्याचे दिसून येत आहेत. सदर सुशोभीकरणाच्या कामांमध्ये फेर रचना करण्यात यावी अशी मागणी इंदापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी केली आहे.
पुढे सावंत म्हणाले की, पुणे-सोलापूर बाजूच्या रोड कडून येणाऱ्या वाहनांना विद्या प्रतिष्ठान कडे जाण्यासाठी योग्य पद्धतीने वळण नसून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात घडू शकतात. तसेच त्या ठिकाणी असलेल्या गोण्या मुळे अपघात होत आहेत. याची नोंद घेऊन त्या ठिकाणच्या गोण्या हटवून खुळे चौक येथील प्रस्तावित सुशोभीकरणाचे काम योग्य रचना करून करण्यात यावे अशी मागणी यावेळी स्वप्नील सावंत यांनी निवेदन द्वारे केली आहे.
*खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत अन्यथा काँग्रेस त्यात वृक्षारोपण करेल. स्वप्नील सावंत.*
खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करेल
इंदापूर शहरातील नेहरू चौकात रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याचे दिसून येत आहे ते खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत अन्यथा काँग्रेस त्यात खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करेल असा इशाराही इंदापूर नगरपरिषदेला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी शहराध्यक्ष चमनभाई बागवान, डॉक्टर संतोष होगले, जाकिरभाई काझी. मिलिंद साबळे, महादेव लोंढे, संदीप शिंदे, आकाश पवार, युवराज गायकवाड, सोफियाना जमादार, सचिन गायकवाड इत्यादी यावेळी उपस्थित होते.

