shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवती तालुकाध्यक्षपदी अश्विनी राऊत कुर्डे यांची नियुक्ती*

*इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवती तालुकाध्यक्षपदी अश्विनी राऊत कुर्डे  यांची नियुक्ती* 
 इंदापूर प्रतिनिधी:(७ ऑक्टोबर २०२१)संसद महारत्न बारामती खासदार सुप्रियाताई सुळे व  राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते  नियुक्तीपत्र(दि.६ ऑक्टो)रोजी देण्यात आले.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवती तालुका अध्यक्षपदी अश्विनी राऊत कुर्डे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे.सदरील नियुक्तीचे पत्र त्यांना बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते निसर्ग कार्यालय गुलटेकडी पुणे येथील कार्यक्रमामध्ये देण्यात आले. यावेळी , जिल्हाध्यक्ष प्रदिप दादा गारटकर ,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे-पाटील,कार्याध्यक्ष अतुल झगडे, महिला जिल्हाध्यक्ष भारतीताई शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला युवती जिल्हाध्यक्ष पूजा ताई बुट्टे- पाटील,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे पाटील ,युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, युवक सोशल मीडिया अध्यक्ष हमा पाटील,तालुका महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर ,इंदापूर शहराध्यक्ष उमाताई इंगोले.
close