बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांचेकडून बैलांचे पूजन
फोटो:- बावडा येथे सणानिमित्त बैलांचे पूजन प्रसंगी हर्षवर्धन पाटील व कुटुंबीय.
इंदापूर: प्रतिनिधी
बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बैलपोळा सणानिमित्त बुधवारी (दि.६) बैलांचे पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजन करून त्यांचे प्रती ऋण व्यक्त केले. बावडा व परिसरात बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या शेतात जातिवंत खिलार बैलांची जोपासना केली आहे. शेतीमध्ये बैलांनी वर्षभर केलेल्या काबाड कष्टाची जाणीव ठेवून त्यांना बैल पोळा सणानिमित्त सजवून गोडधोड खाऊ घालण्यात आले. यावेळी हर्षवर्धन पाटील व कुटुंबातील सदस्यांनी बैलांचे पूजन केले. याप्रसंगी भाग्यश्री पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, राजेंद्र कोरटकर, चित्राताई कोरटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील उपस्थित होते.
_____________________________

