एरंडोल /प्रतिनिधी
एरंडोल नगरपालिका मार्फत दि . ०६/१०/२०२१ रोजी पासून स्वच्छता मोहिमेची सुरुवात नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी , व प्रभाग क्र . ४ मधील नगरसेवक कृणाल महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आली . या मोहिमेत मुख्याधिकारी विकास नवाळे , कार्यालय अधिक्षक हितेश जोगी , आरोग्य निरिक्षक अनिल महाजन , देवेंद्र शिंदे , डॉ . अजित भट , विवेक कोळी , विनोद पाटील , भूषण महाजन , महेंद्र पाटील , डॉ . योगेश सुकटे , शिवशंकर ठाकूर , सौरभ बागड , दिपक गोसावी , विकास पंचबुध्दे , प्रियंका जैन , आदीसह अधिकारी कर्मचारी यांनी स्वछता मोहिमेत सहभागी होते .
सध्यस्थितीत पावसाळा सुरु असल्यामुळे एरंडोल शहरात साथीचे रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे त्यावर उपाययोजना म्हणून संपूर्ण शहरातील नाले , गटारी , रस्ते , खुल्या जागा इत्यादीची युध्दीपातळीवर प्रत्येक प्रभागानुसार दर बुधवारी सर्व एकूण १० प्रभागांची साफसफाई करण्याची व वृक्षारोपणांची मोहिम हाती घेण्यात आलेली आहे . • त्याकरिता नगरपालिकेतील अधिकारी / कर्मचारीची चार टिम करुन कामाचे वाटप करण्यात आलेले आहे . या स्वच्छता मोहिमेत प्रभाग क्र . ४ मधील महात्मा फुले पुताळयाजवळ , मारोती मढी या भागातील नाले , गटारी , रस्ते , खुल्या जागेतील परिसरात साफसफाई , फवारणी करुन सदर परिसरातील सौदर्यात भर पडण्याकामी यामध्ये ऑक्सिजन देणारी वृक्ष व फळझाडे यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे . त्याकामी एरंडोल नगरपालिका मार्फत लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षांचे संगोपन संबंधित भागातील नागरीकांनी करुन न.पा.स सहकार्य करावे