shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गिंताजली कलेक्शन ला महाराज भुषण सिंह होळकर यांची भेट

गिंताजली कलेक्शन ला महाराज  भुषण सिंह होळकर यांची भेट
 इंदापूर प्रतिनिधी: दि.६ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे वंशज राजे भूषणसिंह होळकर यांनी इंदापूर येथील खुळे चौक येथील आनिताई नानासाहेब खरात यांच्या गीतांजली कलेक्शन या कापड दुकानाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. 
यावेळी  राजे म्हणाले कि ,तेजप्रुथ्वी ग्रुपच्या माध्यमातून अनिता ताईचें सामाजिक कार्य अतिशय उत्तम असून त्यांनी केलेल्या या कापड दुकानाच्या लवकरात लवकर अजून शाखा होउन या कापड दुकान च्या माध्यमातून तरुणांना रोजगार कसा मिळेल याचा विचार करावा. राजेनीं तीन चार प्रकारच्या  कपड्याची कॉलिटी पाहून राजे म्हणाले की ,कपडे अतिशय सुंदर आहेत कायम अशेच सुंदर कापड ग्राहकांना द्या. 
ग्राहक हे आपल्या साठी परमेश्वर माणुनच व्यवसाय करा  यावेळेस राजांना औक्षण करून फटाक्यांच्या आतषबाजीत राजेंच स्वागत खरात कुटुंबातील सदस्यांनी केले. तसेच गीतांजली कलेक्शन तर्फे नानासाहेब खरात व शिवाजी खरात यांनी राजेंचा सन्मान केला यावेळेस तेजप्रुथ्वी ग्रुपचे उपाध्यक्ष   गणेशभाऊ शिंगाडे दत्ता पारेकर हनुमंत यमगर सोलापूर हुन समाधान खांडेकर मयूर सूळ , श्रीकांत हंडाळ व इतर  कार्यकर्ते उपस्थित होते
close