*बैलपोळा निमित्त पडस्थळ येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते बैलांचे पूजन*
*पडस्थळ गावाने राबविली एक गाव एक बैल पोळा ही संकल्पना*
इंदापूर प्रतिनिधी-
राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवार दि.6 ऑक्टोंबर रोजी पारंपरिक उत्सव असलेल्या ग्रामीण परंपरेतील बैलपोळा निमित्त पडस्थळ येथे जाऊन पडस्थळ गावाने राबविलेल्या एक गाव एक बैल पोळा या संकल्पनेचे स्वागत करून त्यांनी बैलाचे पूजन केले. पडस्थळ गावकऱ्यांनी यावेळी बैलांची गावातून सवाद्य मिरवणूक काढली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' कोरोना पार्श्वभूमीमुळे गेली सलग दोन वर्षे हा अत्यंत महत्त्वाचा ग्रामीण परंपरा असलेला शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची मदत करणारा, शेतकरी आणि बैल यांचे अतूट नाते असणारा बैलपोळा हा सण साजरा करता आला नाही मात्र यावेळी हा उत्सव साधेपणाने का होईना साजरा करता येत आहे याचा आनंद आहे. पडस्थळ गावकऱ्यांनी एकत्र येऊन एक गाव एक बैल पोळा ही चांगली संकल्पना राबवले असून हा त्यांचा उपक्रम स्तुत्य आहे '
यावेळी भूषणसिंह होळकर, धनगर समाजाचे नेते घनश्याम बापू हाके, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, पांडुरंग मारकड, सुभाष बोंगाणे, महेंद्र रेडके, बळीकाका बोंगाणे, विशाल मारकड, परशुराम रेडके, उपस्थित होते.

