shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रस्त्या अभावी चरमळ वस्ती वरील जिल्हा परिषदेच्या वस्तीशाळा च्या विद्यार्थ्यांची ओढ्यातून जीवघेणी पायपीट..! त्वरित रस्ता करण्याची विद्यार्थ्यांसह प्रहार पक्षाचे माघणी..!!


कोपरगाव : करंजी बु. तालुका कोपरगाव येथील चरमळ वस्ती या वस्तीशाळा मध्ये पहिली ते चौथी शिक्षण घेणाऱ्या मुलांना रस्त्या अभावी अतोनात हाल, जीवघेणी यातना सोसावे लागत आहेत. करंजी बु ते अंदसुल असा हा पूर्वीचा रस्ता ओढ्याच्या बाजूने होता. ओढ्यावर दोन्ही बाजूने झालेले अतिक्रमण काढून चरमळवस्ती शाळे पर्यत ४०० मिटर पर्यंत हा रस्ता तातडीने बनवून देणं खूप गरजेचं आहे.असे प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे यांनी सागितले.   अनेक वर्षांपासून राजकीय अनास्था , प्रशासकीय अनास्था यामुळे हा रस्ता कधीच होऊ शकला नाही. ओढ्यातून या लहान मुलांना भर पावसात चिखलात पायपीट करावी लागते. कधी कधी पाच पाच फूट पाणी ओढ्याला येते, तेव्हा मुलांची शाळा बंदच ठेवावी लागते. 

वस्तीवर जाण्यासाठी देखील रस्ता उपलब्ध नसल्याने नागरिकांनाही ओढ्याचाच रस्ता म्हणून वापर करावा लागतो. मोठी साधने गेल्याने ओढ्याची अवस्थाही एकदम खराब झाली आहे. आणि अशा पाण्याने भरलेल्या ओढ्यातून उद्याच्या भविष्याला घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

 यासंदर्भात करंजी ग्रामपंचायत , पंचायत समिती कोपरगाव , यांच्याशी वारंवार संपर्क करून देखील रस्त्याचा प्रश्न सुटू शकला नाही. प्रशासनास विनंती आहे की,आपल्या माध्यमातून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा रस्ता निदान ४०० मिटर शाळेपर्यंत तरी जलदगतीने बनवून द्यावा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची,जीवाची होणारी हेळसांड थांबवावी. नाही तर प्रहार जनशक्ती पक्षा कडुन नाईलाजाने आंदोलन करण्यात येईल आसा इशार प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर उत्तर जिल्हा कार्यध्यक्ष संजय शिंदे यांनी दिला.
close