*रविवार, ऑक्टोबर ३, २०२१
*युगाब्द : ५१२३
*भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक अश्विन ११, शके १९४३
*सूर्योदय : ०६:२९
*सूर्यास्त : १८:२५
*चंद्रोदय : ०४:१५, ऑक्टोबर ०४ चंद्रास्त : १६:३२
*शक सम्वत : १९४३ प्लव
*चंद्र माह : भाद्रपद
*पक्ष : कृष्ण पक्ष
*तिथि : द्वादशी - २२:२९ पर्यंत
*नक्षत्र : मघा - ०३:२६, ऑक्टोबर ०४ पर्यंत
*योग : साध्य - १६:१८ पर्यंत
*करण : कौलव - १०:५५ पर्यंत
*द्वितीय करण : तैतिल - २२:२९ पर्यंत
*सूर्य राशि : कन्या
*चंद्र राशि ; सिंह
*राहुकाल ; १६:५६ ते १८:२५
*गुलिक काल : १५:२६ ते १६:५६
*यमगण्ड : १२:२७ ते १३:५७
*अभिजितमुहूर्त : १२:०३ ते १२:५१
*दुर्मुहूर्त : १६:५० ते १७:३७
*अमृत काल: ०१:०३, ऑक्टोबर ०४ ते ०२:३८, ऑक्टोबर ०४
*वर्ज्य : १५:३१ ते १७:०६
*समाज सुधारक व शिक्षण तज्ञ् - स्वामी रामानंद तीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर) हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. रामानंद तीर्थ यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. *उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले.
*हैद्राबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रझाकार’ या दहशतवादी संघटनेने मराठवाडा हिंदू जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती.
*२७ ऑक्टोबर, १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. यानंतर निजामाने जातीय दंगली घडवल्या व जनतेवर अत्याचारांना प्रोत्साहन दिले. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले.याचा निजामाला इतका त्रास झाला की त्याने तडजोड मान्य करून संघटनेवरील बंदी हटवली.
*‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक होते.
*हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते.*
*तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले.
*लोकसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकांत गुलबर्गा व औरंगाबाद येथून रामानंद तीर्थ हे निवडून गेले होते. १९७२ साली त्यांचे हैदराबाद येथे निधन झाले.
*१९०३ : हैदराबाद संस्थान स्वातंत्र्य चळवळीतील नेते, समाज सुधारक व शिक्षण तज्ञ् स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म (मृत्यू : २२ जानेवारी, १९७२)
*घटना :
*१६७० : शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटून खजिना स्वराज्यासाठी आणला
*१७७८ : ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कुक अलास्का येथे पोहोचले
*१९३२ : इराकला युनाइटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य मिळाले
*१९३५ : जनरल डी बोनोच्या नेतृत्वाखाली इटलीने इथोपिया पादाक्रांत केले
*१९५२ : युनायटेड किंग्डमने यशस्वीरीत्या अण्वस्त्र शस्त्रांची यशस्वी चाचणी करून जगातील तिसरे परमाणू सशस्त्र राष्ट्र बनले
*१९९० : पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.
*• मृत्यू :
*१९५९ : विनोदी लेखक , विडंबनकार, व स्तंभलेखक दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर उर्फ सख्याहरी यांचे निधन (जन्म : २२ सप्टेंबर, १९०९)
*१९५९ : भारतीय लेखक व राजकारणी मा. पो. सी यांचे निधन (जन्म : २६ जून, १९०६)
*२००७ : सलमान खान व त्याचे अंगरक्षकाविरुद्ध एफ आय आर नोंदवणारे रवींद्र पाटील यांचे टी बी मुळे निधन (अर्थात हे मृत्यू कारण संशयास्पद आहे)
*२००७ : पत्रकार , लेखक शैक्षणिक तज्ञ् एम एन विजयन यांचे निधन (जन्म : ८ जून, १९३०)
*२०१२ : दिल्लीचे महापौर, सिक्कीमचे राज्यपाल केदारनाथ सहानी यांचे निधन (जन्म : २४ ऑक्टोबर, १९२६)
*२०१२ : भारतीय धर्म शास्त्रज्ञ् व विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचे निधन (जन्म : १ सप्टेंबर, १९३१)
*जन्म :
*१९०७ : निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता इ. साहित्य प्रकार हाताळणारे लेखक नरहर शेषराव पोहनेरकर यांचा जन्म (मृत्यू : २ सप्टेंबर, १९९०)
*१९१४ : टीकाकार म. वा. धोंड यांचा जन्म (मृत्यू : ५ डिसेंबर, २००७)
*१९४९ : चित्रपट दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांचा जन्म.
*आपला दिवस मंगलमय जावो
*जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्
*🙏माहितीस्तव: लोकसेवा विकास आघाडी, श्रीरामपुर

