shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शरदचंद्रजी पवार यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा निमित्त श्री नंदिकेश्वर मंदिरात महायज्ञ संपन्न.इंदापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दीर्घायुष्याच्या दिल्या शुभेच्छा.

शरदचंद्रजी पवार यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा निमित्त श्री नंदिकेश्वर मंदिरात महायज्ञ संपन्न.

इंदापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दीर्घायुष्याच्या दिल्या शुभेच्छा.
  
 इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दगडवाडी येथील श्री नंदिकेश्वर मंदिरात  शरदचंद्रजी पवार यांचा आज कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा  निमित्त(१९ ऑक्टोबर) रोजी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने श्री नंदिकेश्वरास राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर व त्यांच्या सुविद्य   
पत्नी स्नेहा रुपनवर  यांच्या शुभहस्ते महायज्ञ घालून शरदचंद्रजी पवार यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो असे ईश्वरचरणी प्रार्थना करून कोजागिरी पौर्णिमे निमित्त सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
 .या विशेष कार्यक्रमाच्या प्रसंगी अनेक मान्यवरांनी शरदचंद्रजी पवार यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून दिर्घायुष्याच्या शब्दसुमनांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी म्हटले की,देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब हे ख-या अर्थाने महाराष्ट्राचे आधारवड असुन जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकटे आली तेव्हा तेव्हा सामान्य माणसांच्या संकटात धावून जाणारा एकमेव लोकनेता म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री पदासह देशातील अनेक महत्त्वपूर्ण पदे आदरणीय साहेबांनी यशस्वीपणे भूषविली आहेत. आत्ता तमाम राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की २०२४ साली आपल्या सर्वांना देशाचे पंतप्रधान म्हणून साहेबांना पाहायचं आहे. यामुळेच आज या महायज्ञाचे आयोजन केले. असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत  रणवरे यांनी सांगितले की, पवार साहेबांचा आजचा हा सहस्त्र चंद्र दर्शनाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने तमाम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने भाग्याचा दिवस असून गेल्या पन्नास वर्षापासून अविरत कार्य करणाऱ्या सह्याद्री एवढ्या उंचीच्या आदरणीय पवार साहेबांचे आपण कार्यकर्ते आहोत याचा निश्चितपणे गर्व आपल्या सर्वांना असून उभा महाराष्ट्र परिपाठ असलेला या राज्याच्या इतिहासा मधील एकमेव लोकनेता म्हणजे आदरणीय साहेब असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजीराव पानसरे सर यांनी प्रास्ताविक केले,तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विरसिंह रणसिंग,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.शुभम निंबाळकर,पंचायत समितीचे सदस्य सतिश  पांढरे,राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष तात्यासाहेब वडापूरे,भटक्या विमुक्त जाती- जमाती सेलचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब धोत्रे,अपंग सेल तालुकाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य दत्ता बाबर,दगडवाडीचे माजी सरपंच पिंगळे ,शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ॲड.नितीन कदम, आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास बावडा‌ गावचे युवानेते संग्रामसिंह पाटील,निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धनंजय रणवरे, राष्ट्रवादी युवतीच्या तालुकाध्यक्ष अश्विनी कुर्डे,राष्ट्रवादी पदवीधर सेलचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, युवा नेते संजय  चव्हाण,राष्ट्रवादीचे माजी तालुका उपाध्यक्ष बबन रासकर,तालुका सरचिटणीस सुभाष-डरंगे-पवार, राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस विकास रासकर,अभिजीत रूपनवर,घोरपडवाडीचे सरपंच राजेंद्र चांगणे,दगडवाडीचे  आप्पा पारेकर,उपसरपंच रामदास रासकर, सदस्य विठ्ठल कुदळे, किसन मोठे संजय केसकर, माजी सरपंच तुकाराम रासकर, माजी सरपंच दादा काळे,निरवांगी गावचे जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठल पवार,समिर पोळ,दादा सुळ,शिवाजी जगताप, महादेव मिसाळ,विठ्ठल महाडिक, सुखदेव निकम,सचिन हेगडकर यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजीराव पानसरे सर यांनी केले होते.
close