सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या लोकाभिमुख कार्यकर्त्यांना काँग्रेस ताकद देणार-जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख..!!
प्रांताध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले व खासदार सौ.रजनीताई पाटील यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे २४ ऑक्टोबर रोजी अंबाजोगाईत आयोजन
================
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार,दिनांक १९ ऑक्टोबर रोजी विद्या व्हॅली ग्लोबल स्कुल,अंबाजोगाई येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक पातळीवर आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूका आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बांधणी व बळकटी तसेच प्रांताध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले व खासदार सौ.रजनीताई पाटील यांच्या भव्य सत्कार सोहळा आयोजना संदर्भात चर्चा करण्यात आली.यावेळेस जिल्हा काँग्रेस कमेटीच्या आढावा बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,काँग्रेसने आगामी सर्वच निवडणुका या स्वबळावर लढवाव्यात अशी एकमुखी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.याप्रसंगी बोलताना सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या लोकाभिमुख कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्ष संघटनेत काम करण्याची संधी देवून सर्व शासकीय कमिट्यांवर नियुक्ती करून ताकद देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले.
अंबाजोगाईत आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख तर विचारमंचावर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुलभैय्या सोनवणे,ज्येष्ठ नेते बाबुरावजी मुंडे,किसान काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष एॅड.माधव जाधव,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस अनिलराव मुंडे,महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.मिनाक्षीताई पांडुळे पाटील,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे,नवनाथराव थोटे यांची तर बैठकीस संपूर्ण बीड जिल्ह्यातून काँग्रेस कमेटीचे सर्व आजी,माजी पदाधिकारी,विविध सेलचे अध्यक्ष उपस्थित होते.मागील काही वर्षांत बीड जिल्हा काँग्रेस कमेटीची अशी व्यापक व तगडी बैठक झाली नव्हती असे अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळेस सांगितले.प्रास्ताविक करताना काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुलभैय्या सोनवणे म्हणाले की,आपल्या नेत्या सौ.रजनीताई पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड आणि राजेसाहेब देशमुख यांची बीड काँग्रेस कमेटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे.ज्या लोकांना काँग्रेस पक्षाने ३० वर्षे भरभरून दिले,तेच लोक अन्याय झाला म्हणतात याचे आश्चर्य वाटते.
परंतू,काँग्रेस संपली नाही आणि कधीही संपणार नाही.काँग्रेस संपली म्हणणारांना ताकद दाखवून द्यायची आहे.त्यामुळेच येत्या २४ ऑक्टोबरला प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले व खासदार सौ.रजनीताई अशोकराव पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा अंबाजोगाईत आयोजित करण्यात आला आहे.यासाठी काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष सोनवणे यांनी केले.याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाबुरावजी मुंडे,किसान काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष एॅड.माधव जाधव,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस अनिलराव मुंडे,महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.मिनाक्षीताई पांडुळे पाटील,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे,नवनाथराव थोटे, वसंतराव मुंडे(परळी),रविंद्र ढोबळे (विधानसभा अध्यक्ष,आष्टी-पाटोदा-शिरूर),गणेश कवडे (पाटोदा तालुका),संभाजी जाधव(शिरूर तालुका),धुमाळ सर (गेवराई),नारायणराव होके (माजलगाव),सिध्देश्वर रणदिवे (धारूर),शुभम माने (माजलगाव), बिपीनचंद्र (बाळासाहेब) ठोंबरे (केज), कविताताई कराड (केज),शहराध्यक्ष डॉ.इद्रिसभाई हाश्मी (बीड),शहराध्यक्ष सय्यद बहाद्दूर ऊर्फ हनिफ (परळी वैजनाथ),माजी शहराध्यक्ष तारेख अली उस्मानी (अंबाजोगाई),अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे (माजलगाव) आदींनी बैठकीतील चर्चेत सहभाग घेऊन समायोचित भाषणे करून मौलिक सूचना केल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात या सर्व सूचनांचे स्वागत करताना जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की,बीड जिल्हा एक जिवंत आणि ऊर्जावान काँग्रेस आहे.रस्त्यावर उतरून जो जनतेचे काम करेल त्याच कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेचे पद,शासकीय समितीत काम करण्याची संधी मिळेल.कर्तबगार प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले,खासदार सौ.रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वात आपण सर्वजण मिळून बीड जिल्ह्यात काँग्रेस अधिक सक्षम,बळकट व मजबूत करू.काँग्रेस सर्व समाजघटकांतील सामान्य कुटुंबातील तरूणांना राजकारण व समाजकारणात संधी देणार आहे.काँग्रेस हा जनसामान्यांचा आणि सर्वधर्मसमभाव जोपासणारा पक्ष आहे,भारतीय जनतेला सोबत घेऊन काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.हे आपण सर्वजण जाणतच आहात.आजही काँग्रेस पक्षावर लोकांचा मोठा विश्वास आहे.या विश्वासाला पुन्हा एकदा जागे करण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमेटीकडून सातत्यपूर्ण बैठका आयोजित करण्यात येतात.तसेच विविध उपक्रम देखिल राबविण्यात येतात.काँग्रेस वाचली तरच देश वाचणार आहे.कुणी पक्ष सोडून गेल्याने काँग्रेस संपणार नाही.कारण,काँग्रेस जनतेच्या मनामनात जिवंत आहे.आपण सर्वजण मिळून,जुन्या नव्यांचा संगम करून नव्या जोमाने काँग्रेस पक्ष बांधणी करू.
आगामी सर्वच निवडणुकांत जनता चमत्कार दाखवणार असा विश्वास आहे.येत्या २४ तारखेला प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले आणि खासदार सौ.रजनीताई अशोकराव पाटील यांचा "न भूतो,न भविष्यति" असा भव्य सत्कार सोहळा अंबाजोगाईत आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यात आपण काँग्रेस विचारांचे सच्चे पाईक म्हणून सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले.बीड जिल्ह्यातील काँग्रेस कमिटी अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागाचे पदाधिकाऱ्यांसह विविध सेलचे अध्यक्ष यांच्याशी थेट संवाद साधण्यात आला.या माध्यमातून बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात आला.जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करणे प्रभावीपणे कार्य करून आगामी काळात होणा-या जिल्हा परीषद,पंचायत समिती,नगरपरिषद, नगरपंचायत,ग्रामपंचायत आदींसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.यापुढे बीड जिल्हा काँग्रेस कमेटीच्या सर्व बैठका वेगवेगळ्या तालुक्यात घेण्यात येणार आहेत.पहिली बैठक बीड येथे घेण्यात आली.तर दुसरी बैठक अंबाजोगाईत घेण्यात आली.बैठकीचे सुञसंचालन ईश्वर शिंदे यांनी करून उपस्थितांचे आभार संजयराव काळे यांनी मानले.या बैठकीस पशुपतीनाथ दांगट,कपिल मस्के,माजी तालुकाध्यक्ष वसंतराव मोरे,एॅड.अनंतराव जगतकर,राज्य समन्वयक संजय वाघमारे,माजी नगरसेविका बिलकीस कच्छी,संजयराव काळे,ईश्वर शिंदे,खंडेराव टेमकर,प्रविण देशमुख,गणेश गंगणे, बाळासाहेब जगताप, अशोक देशमुख,किरण उबाळे,सुबराव सोळंके (धारूर),जिल्हा उपाध्यक्ष परवेज भाई कुरेशी,असंघटित कामगार काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष
संतोष निकाळजे,सय्यद मोसिन भाई,ऍड.जाकीर भाई पठाण,सय्यद साजिद सलीम,शेख सईद,कुंभार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष जालिंदर कराडकर (बीड),सोहेल खान,महेश बेदरे (गेवराई),पांडुरंग मस्के (वडवणी) यांच्यासह बीड,गेवराई,आष्टी-पाटोदा-शिरूर,माजलगाव,वडवणी,धारूर,केज,परळी,अंबाजोगाई येथील काँग्रेस पक्षाचे आजी,माजी पदाधिकारी,नगरसेवक,बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विविध सेलचे जिल्हाध्यक्ष,आजी माजी तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाधिकाऱ्यांसह महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,सेवादल काँग्रेस,अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्याक सेल,ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया,इंटक आदी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

