shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चाळीस वर्ष्याच्या कारकिर्दीनंतर काँग्रेस नेते राजकिशोर (पापा) मोदी यांचा ना. जयंत पाटील, ना. अजितदादा पवार, ना. धनंजय मुंडे, ना. संजय बनसोडे आदींच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश..!!

  • विकास कामात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव राजकिशोर मोदी यांच्या पाठीशी - ना.अजितदादा पवार
  • पक्षातील नव्या व जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जिल्ह्यात राष्ट्रवादीची एकजूट वाढवावी - धनंजय मुंडे

 प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अंबाजोगाईची नगर परिषद गेली २५  वर्षांपासून एकहाती ताब्यात ठेवलेले राजकिशोर (पापा) मोदी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढणार असून अंबाजोगाई नगर पालिकेसह केज विधानसभेतही पक्ष एकहाती विजय मिळवेल असा विश्वास उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी राजकिशोर मोदी यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. तसेच विकास कामासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी राहुत अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादांनी पवार यांनी दिली . केवळ बीड जिल्ह्यातच  नव्हे तर मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यामध्ये ही राजकिशोर मोदींचा दांडगा संपर्क असून त्यांच्या फायदा देखील आपणास पक्षवाढीसाठी होणार असल्याचे अजितदादांनी यावेळी आवर्जून नमूद केले . ते मुंबई येथे राजकिशोर मोदी आणि त्यांचे अनेक नगरसेवक तथा  असंख्य कार्यकर्ते यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश प्रसंगी बोलत होते .

          


काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी यांनी त्यांचे शेकडो सहकारी व पदाधिकारी यांनी आज मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रांताध्यक्ष ना. जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी ना. अजितदादा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे पक्षात स्वागत करत शुभेच्छा दिल्या. 

        

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश प्रसंगी राजकिशोर मोदी यांनी सांगितले की जाणता राजा आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या आशीर्वादाणे आणि आदरणीय नामदार अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करू . आणि येणारी नगर परिषद पूर्ण ताकदीने लढवून राष्ट्रवादी काँग्रेस चा झेंडा अंबाजोगाई नगर परिषदेवर फडकाऊ असा विश्वास राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केला .तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे आणि स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री ना संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाने आणि सहकार्याने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामील होण्याचे ठरविले .ना धनंजय मुंडे यांनी आपणास वेळोवेळी विकास कामाच्या बाबतीत सहकार्याचीच भूमिका घेतल्याने आपण त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास टाकल्याचे देखील मोदी यांनी सांगितले तसेच केज विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ताब्यात ठेवण्यात येईल असेही आश्वाशीत केले .

राजकिशोर मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशबद्दल शुभेच्छा देतांना  पालकमंत्री ना धनंजय मुंडे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्व सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. आज नव्याने पक्षप्रवेश झालेले पापा मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांची विचारसरणी देखील समान आहे. त्यामुळे पक्षाच्या वाईट काळात सोबत राहिलेले जुने कार्यकर्ते यांच्यावर कोणताही अन्याय न होऊ देता, जुने व नवे अशा सर्वांनाच सोबत घेऊन जिल्ह्यात एकजुटीने पक्षावाढीसाठी काम करावे असा उल्लेख सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. 

               

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार,  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे,  स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री ना. संजय बनसोडे यांच्यासह आ.सतिषभाऊ चव्हाण, आ. संजय भाऊ दौंड, आ. संदीप भैय्या क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, मा.आ. बसवराज पाटील, माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी आ सय्येद सलीम, मा.आ. राजेंद्र जगताप, मा.आ. संजय वाघचौरे, रा.कॉ. बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, रा.कॉ.औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, रा.यु.कॉ.चे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, राजेसाहेब चव्हाण, शिवाजी सिरसाट, सुरज चव्हाण, भाऊसाहेब तरमळे तसेच राजकिशोर मोदी व विजय चव्हाण यांच्यासमवेत प्रवेश केलेले सर्व सहकारी पदाधिकारी उपस्थित होते.


यांचा झाला पक्षप्रवेश...    

कापूस पणन महासंघाचे उपाध्यक्ष ऍड विष्णूपंत सुभानराव सोळंके,माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक मनोज मोहनलाल लखेरा,  नगरसेवक महादेव निवृत्तीराव अदमाने,  नगरसेवक वाजेद खतीब,  नगरसेवक धम्मपाल सरवदे,  नगरसेवक सुनिल सुरेशराव व्यवहारे, अमोल विजयकुमार लोमटे,  नगरसेवक दिनेश मोतीलाल भराडिया,  नगरसेवक संतोष रानबा शिनगारे,   अंबाजोगाई पिपल्स बँकेचे उपाध्यक्ष प्रकाशचंद्र बालचंद सोळंकी,  संचालक प्रा. वसंतराव बळीराम चव्हाण, हाजी महेमूद साहब, अरुण रामकृष्ण काळे, किशोर मुन्नालाल परदेशी, विजयकुमार शिवनारायण लखेरा, शेख खालेद ताहेर, चाऊस शेख,  माजी नगरसेवक दगडूभाई समियोदीन खतीब, अशोक भागूराम जेथे, राजेंद्र विठ्ठलराव मोरे, गणेश शंकरराव मसने, डॉ . राजेश मधूकरराव इंगोले, शेख जमील भाई,  बीड तालुका काँग्रेस चे उपाध्यक्ष महादेव धांडे, धारूर काँग्रेस चे अजयसिंह दिख्खत, शिवाजी तुळशीराम गायकवाड, माणिक शेषेराव वडवणकर, रूपेश चव्हाण, सारडा कचरु हिरालालजी, वाघाळकर सुनिल बाबूराव, राणाप्रताप दगडू चव्हाण, गोविंद लिंबाजी पोतंगले , औदुंबर अविनाशराव मोरे, सचिन विलासराव जाधव, रशीद खान पठाण ( सुगांव ), दिनेश घोडके, भारत बालासाहेब जोगदंड, महेबूब गवळी, मुख्तार शेख, जावेद गवळी, रफिक गवळी, शेख अनिस गुत्तेदार, कैलास नाना काबंळे, चंद्रकांत व्यंकटराव महामुनी, विशाल बबूवान पोटभरे,अॅड . सतिश घोगरे, अकबर पठाण, अश्विन सांवत, अशोक राजाराम देवकर, यांसह विविध तालुक्यातील पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी आदींचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश संपन्न झाला.

close