गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होईल- शरद शिनगारे
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या शिफारशीवरून व पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मंजूरीने जिल्हाधिकारी बीड यांनी नुकतेच राज्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करिता सहाय्य (आत्मा)अंतर्गत धारूर तालुका शेतकरी सल्ला समिती (बीएफएसी) स्थापन केलेली आहे.
सदरील बैठकीपूर्वी सदस्यांच्या सत्कार समारंभात प्रा.ईश्वर मुंडे, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल हे बोलत होते.
या वेळी तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजनांची माहीती दिली.
तालुक्यातील कृषी विषयक विविध कार्यक्रम राबवणे बाबत वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या बैठका,सभा,निर्णयाकरिता जबाबदारी पारपाडण्यासाठी सदरील समिती स्थापण करण्यात आलेली आहे.
सदरील समितीमध्ये सटवा अंडील(पहाडी पारगाव),गौतम सोळंके(मोहखेड),श्रीहरी पारेकर(काळ्याची वाडी),मंगेश थोरात(पांगरी),बजरंग माने (आरणवाडी),दिगांबर साखरे (तांदळवाडी),रामधन घोळवे(आंबेवडगाव),श्रीकृष्ण साखरे(चिंचपूर),महेश तिडके(पिंपरवाडा),सौ.उषा दिलीप तिडके(पिंपरवाडा),वसिष्ठ जायभाय(जायभायेवाडी),रामकिसन व्हरकटे(व्हरकटवाडी),रमेश बडे(देव दहिफळ),सौ.आशाबाई विठ्ठल बडे(देव दहिफळ),शिवाजी यादव (धुनकवाड),बाबासाहेब तोंडे (सोनीमेहा),संतोष देशमुख (कान्नापूर),विनायक सौंदनकर (कोयाळ),बाळासाहेब सोळंके(हिंगणी बु ),प्रताप सोळंके(हिंगणी खु),नंदकुमार भोसले (शिंगणवाडी),संदिपान सोळंके(आमला),नेताजी सोळंके (रूई धारूर),अमर काशिद (चिखली) यांचा समावेश आहे.
गुरूवारी समितीची पहिली बैठक तालुका कृषी अधिकारी कार्यालय,धारूर येथे संपन्न झाली. सर्व सदस्यांचा नियुक्ती पत्र व पुष्प गुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास सी व्ही कांबळे कृषी अधिकारी,वाघमोडे एस यू मंडळ कृषी अधिकारी यांचे सह कृषी पर्यवेक्षक,कृषी सहाय्यक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गौतम सोळंके (मोहखेड)हे होते.
सदरील बैठकीत आत्मा योजनेच्या शेतकरी मित्र,पीक प्रतेक्षिके,शेतकरी प्रशिक्षण,गट क्षमता बांधणी,किसान गोष्टी या आर्थिक वर्षात झालेल्या व होणाऱ्या कार्यक्रमा विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर धय,सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक,संतोष देशमुख सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी परिश्रम घेतले.
सुत्र संचालन आर व्ही राऊत कृषी पर्यवेक्षक यांनी केले तर आभार लामतुरे कृषी सहाय्यक यांना मांडले.

