गुजरात मधील ६० वर्षीय रुग्णावर यशस्वी लेझरद्वारे उपचार
शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
राहाता येथील डॉ. गोरे हॉस्पिटल मध्ये (बडोदा) गुजरात मधील ६० वर्षीय रुग्णावर यशस्वी लेझरद्वारे उपचार करण्यात आले असून उपचारानंतर लगेचच रुग्णाने स्वतः वाहन चालवत गुजरातकडे प्रस्थान केले. गुजरात बडोदा येथील गेल्या अनेक वर्षांपासून मूळव्याध या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण सुरेश सौंधणे यांना अनेकांनी राहाता येथील मुळव्याधतज्ञ डॉ. किरण गोरे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला त्यानुसार ते गोरे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. हॉस्पिटलमधील अद्ययावत उपकरणे, कर्मचाऱ्यांचा नम्रपणा व अत्याधुनिक उपचार पद्धती पाहून त्यांनी हॉस्पिटलचे कौतुक केले. डॉ गोरे यांनी त्यांच्यावर जर्मन लेझरद्वारे उपचार करून त्यांना तत्काळ डिस्चार्ज देऊन गोरे हॉस्पिटलच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. उपचारानंतर त्यांनी डॉ. गोरे व सर्व स्टाफचे आभार मानले. डॉ. गोरे हॉस्पिटलमध्ये मुळव्याध, फिशर, हर्निया, पोटाचे विकार, व्हेरिकोज व्हेन्स (पायाच्या फुगलेल्या नसा) या सारख्या आजारापासून त्रस्त असलेल्या रुग्णांवर लेदर टेक्नॉलॉजीद्वारे वेदनाविरहित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे डॉ. गोरे हॉस्पिटलची ओळख संपूर्ण देशभर झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मूळव्याध आजाराने त्रस्त होतो. अनेक नामवंत हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला. परंतु कुठेही फरक पडला नाही. राहाता येथे डॉ. गोरे हॉस्पिटलचे अनेक रुग्णांकडून नाव ऐकले होते. त्यामुळे उपचार देण्यासाठी तिथे आलो. डॉ. किरण गोरे यांनी लेझरद्वारे उपचार केल्याने वेदना थांबल्या. त्यामुळे खूप समाधान वाटले, असे गुजरात सुरेश सौंधणे, यांनी सांगितले.
अनेक वर्षापासून मुळव्याध, फिशरहर्निया, पोटांचे विकार, व्हेरिकोज व्हेन्स यासारख्या आजारापासून त्रस्त असलेल्या रुग्णांवर लेझर टेक्नॉलॉजीद्वारे वेदनारहित यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो. राज्यासह देशातून आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्ण गोरे हॉस्पिटल येथे येत असल्यामुळे मोठे समाधान वाटते.
- डॉ. किरण गोरे, मुळव्याध तज्ञ

