shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्राचार्या सौ. मंगल पाटील यांच्या 'आयुष्याच्या वळणावर 'पुस्तकाचे प्रकाशन संपन्न..!!

शिरसगाव (बाबासाहेब चेडे )रयत शिक्षण संस्थेच्या माजी प्राचार्या सौ. मंगल श्रीधर पाटील यांच्या 'आयुष्याच्या वळणावर 'या ललितगद्य पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मंचर येथे नुकताच संपन्न झाला. 

   



येथील स्नेहप्रकाश प्रकाशनतर्फे प्राचार्या सौ.मंगल पाटील यांच्या पुस्तकाच्या प्रकाशिका सौ.स्नेहलता कुलथे आणि मुद्रक, स्नेहदीप ऑफसेट प्रिटर्सचे प्रमुख पत्रकार प्रकाश कुलथे यांनी अतिशय सुंदर पुस्तकांची निर्मिती केली आहे अशा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ऑनलाईन,ऑफलाईन स्वरूपात मंचर येथील अण्णासाहेब आवटे कॉलेजमध्ये संपन्न झाला.राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर आणि सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे उपस्थित होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.के. जी. कानडे होते तर संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या आणि श्रीरामपूर रयत शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्ष मीनाताई जगधने,पत्रकार प्रकाश कुलथे,साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये,प्राचार्य उत्तमराव आवारी,  सामाजिक कार्यकर्ते अजय आवटे, महाराष्ट्र महावक्ता आकाश पाटील, डॉ. अनुराधा पाटील, सौ.स्वीटी उर्फ स्वप्ना समीर बुर्ले,प्रा.डॉ.सविता मेनकुदळे, श्रीकांत शितोळे,माजी प्रा.विजया शेटे,सौ. मंदाकिनी उपाध्ये , सौ.कानडे,प्रा.डॉ.सीमाताई चव्हाण, प्रा.डॉ.बाळासाहेब गार्डीआदींची उपस्थिती होती. 

   

प्रा.डॉ.सीमा चव्हाण यांनी स्वागत,प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. कानडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला."आयुष्याच्या वळणावर "या पुस्तकाचे विवेचन केले.प्राचार्या सौ.मंगलताई पाटील यांनी पुस्तकांची निर्मिती कथा सांगून म्हणाल्या,माझे वडील अण्णासाहेब मुळे हे कर्मवीरांच्या सहवासात होते.कर्मवीरांच्या कार्याला त्यांनी समर्पित केले होते.माझा जन्म 01जुले 1052रोजी झाला.मी सातारला वडिलांबरोबर कल्याणी चाळीत आणि संस्थेत बऱ्याच वेळेस कर्मवीर अण्णा यांना पाहिलेले आहे. मी सात वर्षाची होते तेव्हा 09मे 1959रोजी कर्मवीर अण्णा यांचे निधन झाले, माझे वडील अंत्यविधीला होते.सर्व फोटो पुस्तकात आहेत.प्राचार्य डॉ.मेनकुदळे, प्रकाशक प्रकाश कुलथे, माझा मानलेला मुलगा साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये, प्रकाशिका सौ.स्नेहलता कुलथे, श्रीकांत शितोळे, कुटुंब यांनी खूप सहकार्य केले, त्यामुळे खूप छान पुस्तक प्रकाशित झाले.प्राचार्य डॉ.कानडे यांनी आग्रह करून, मनापासून मंचरला प्रकाशन सोहळा घेतला त्याबद्दल आभार मानले. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी "आयुष्याच्या वळणावर "या पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेत सहभागी होता आल्याचा आनंद व्यक्त केला. आकाश पाटील, अजय आवटे आणि वक्तृत्व स्पर्धकांनी मनोगत व्यक्त केले.प्रा.डॉ.सीमा चव्हाण यांनी शेवटी विवेचन करून समारोप केला.

close