shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली प्रवरा हेल्प टीमचा भारत बंदला पाठिंबा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
राहुरी: ११ऑक्टोंबर २०२१.
      लखीमपुरमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्याचे दिवट्या चिरंजीवांनी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करुन परतणा-या शेतक-यांवर भरधाव गाडी घुसवून काहीं जीवे मारले तर काही जखमी केले. किती क्रुर व अमानवी प्रकार आहे.याची जेवढी म्हणुन निंदा करावी तेवढी थोडी. काल त्या दिवट्याला अटक झाली. कोर्ट काय शिक्षा देईल. पण गेलेले जीव थोडेच परत येणार. 
   
  गेली वर्षभर हे शेतकरी आंदोलन सुरु आहे. २७ सप्टेंबर २०२० ला हे तीन कृषी सुंधारणा कायदे पारित झाले. त्याविरोधात पंजाब व आजुबाजुच्या राज्यात प्रचंड असंतोष व विरोध आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात कमी आहे. परंतु उद्याच्या भारत बंदने यांस धार येईल. राज्यातील तिन्ही सत्तारुढ पक्ष व मित्रपक्षांचा हा बंद आहे. तो नक्की यशस्वी होणार यात शंका नाही. त्यांस आमचे हेल्प टीमचा पाठींबा आहे. मा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांना प्रेरणास्त्रोत्र मानणा-या हेल्प टीमने आत्ता पार पडल्या बैठकीत मा. मुख्यमंत्री यांचे आवाहनानुसार बंदमध्ये भाग घेत बंदला पाठींबा दिला आहे. आपणहि या बंदला पाठिंबा द्या. 
           आता हे कृषी कायदे काय आहेत. त्यातील बदल काय आहेत. त्यातुन काय फायदा  होणार वा तोटा होणार.हे आपणांस माहित असणे गरजेचे. एव्हाना तुम्हांला माहित झाले असेलहि. परंतु ज्यांना माहित नाही त्यांना हे तीन कृषी कायदे त्याचे फायदे तोटे वाचावे व कायदे समजुन घ्या. अन् या बंदला पाठींबा द्यावा ही विनंती.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600
close