shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आपला माणूस आपल्यासाठी या तत्वाचा सामाजिक बांधिलकी जपणारा एकनिष्ठ हर्षवर्धन पाटील यांचा कार्यकर्ता म्हणजेच अमोलराजे इंगळे.

आपला माणूस आपल्यासाठी या तत्वाचा  सामाजिक बांधिलकी जपणारा एकनिष्ठ हर्षवर्धन पाटील यांचा कार्यकर्ता म्हणजेच अमोलराजे इंगळे.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील जनसामान्य व्यक्ती म्हणजे  उद्योगपती राजाभाऊ इंगळे यांचे बंधू अमोलराजे इंगळे होय. अमोलराजे इंगळे यांनी आपल्या वडील व भाऊ यांच्या विचाराने पाच ते सहा वर्षे कोल्हापूर याठिकाणी पैलवानकी केली. या काळातच त्यांनी आपल्या शारीरिक वृद्धि बरोबर मित्र परिवारा मार्फत संघटनात्मक बांधणी सुरू केली. कोल्हापूर येथे पैलवानकी करीत असताना हर्षवर्धन पाटील हे तेथील यावेळी पालकमंत्री असल्याने तिथेच इंगळे हे पाटील यांचे युवा खंदे समर्थक बनले.
 २०१६ च्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत अमोलराजे इंगळे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार पदासाठी नाव चर्चेत आले. याच निवडणुकीत उमेदवारी मिळाले नसले तरी चांगले काम केले. पुढे ते आपल्या मित्र परिवाराच्या माध्यमातून आपला माणूस आपल्यासाठी या तत्वानुसार त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत सतत अनेक उपक्रम राबवले. त्यातून सामाजिक, राजकीय ,क्रीडा, अध्यात्मिक, वृक्षसंवर्धन, प्रशासकीय, लहान-मोठे, आबालवृद्ध यांचा मान सन्मान राखत .त्यांनी २०१६ पासून ते आज पर्यंत आपल्या सामाजिक कार्यातून आपले नाव लौकिक केले आहे.
 सर्वांचा मानसन्मान ठेवणारा ,सर्वांशी हसतमुख गप्पागोष्टी करणारा, अडीअडचणीच्या काळात धावून जाणारा, युवा तरुणांना व्यवसाय मुख बनवणारा हा तरुण युवकांचा युवा शेलेदार आज त्यांच्या विविध उपक्रमातून लोकांच्या मनामनात ठसा उमटवलेला दिसून येतो. काटी वडापुरी गटात जिल्हा परिषदेचे भावी सदस्य म्हणून नागरिकांच्या चर्चेत असणारा युवा कार्यकर्ता कोणतेही पद नसताना हर्षवर्धन पाटील यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग आपल्या कर्तुत्वाने नोंदवून त्यांच्याशिवाय कोणताच कार्यक्रम न करणारा आणि जिवाभावाचा माणूस म्हणून हर्षवर्धन पाटील व त्यांचे परिवार इंगळे परिवाराच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असलेले नेहमी दिसते. म्हणूनच अमोलराजे इंगळे हर्षवर्धन पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. जरी पद नसले तरी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमातून हर्षवर्धन पाटील यांच्या कार्याचा गुणगौरव नेहमी इंगळे यांच्या वतीने होत असल्याचे सर्वांना ज्ञात आहे. 
५ ऑक्टोबर२०२० रोजी निमगाव केतकी येथे नवनिर्वाचित पत्रकार संघ यातील बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. सदर आयोजित कार्यक्रमांमध्ये त्या वेळी अमोलराजे इंगळे यांना लवकरच संधी देणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले होते.ती संधी इंगळे यांना आज ना उद्या कधी तरी मिळेल याबद्दल शंका नाही. या शब्दांमुळे जनतेमध्ये इंगळे यांना कोणत्या स्वरुपात संधी मिळेल याची उत्सुकता जनतेला राहणार हे मात्र खरे आहे. अमोलराजे इंगळे यांचे प्रत्येक सामाजिक कार्य हे सर्वसामान्य जनतेला आणि हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाला धरूनच असते त्यामुळे ते सर्वांच्या नजरेत निष्ठावंत व एकनिष्ठ युवा कार्यकर्ते म्हणून सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता म्हणून पाहिले जाते . बाभूळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत अमोल इंगळे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी सर्व जागा निवडून आणण्यात यशस्वी झाले. या  प्रचारा काळात इंगळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या वहिनी संगीता इंगळे या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.
त्यांना  अनेक सामाजिक राजकीय जाणकाराकडून विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या कार्याची गाथा पाहिली तर त्यांच्या सोशल मीडिया यातील सर्व घटकात आपल्याला पुराव्यांनिशी दिसते. अशा अनुभवी युवा कार्यकर्त्यास या जनतेच्या सेवेसाठी कशी संधी मिळेल ? ही जनता पाहत आहे. जरी संधी मिळाली किंवा नाही तरीपण सामाजिक बांधिलकीत सतत कार्यक्षम राहणारा फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करणारा जनसामान्यांचा माणूस व हर्षवर्धन पाटील यांचा एकनिष्ठ व त्यांचा शब्द पाळणारा युवा कार्यकर्ता म्हणजेच अमोलराजे इंगळे आपला माणूस आपल्यासाठी याला साजेसे कार्य करतील असा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला विश्वास आहे.
close