shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धक्कादायक..! सोनईत पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोरच तरुणास भोकसले..!!

प्रतिनिधी मोहन शेगर, सोनई
सोनई येथील मुस्लिम समाज संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि 25 रोजी, सकाळी गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरुन वाद झाले असल्याचे सोनई पोलीसांना खबर दिल्याने पोलीस त्या ठिकाणी हजर झाले. काही वेळाने सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे पोलीस नाईक बाबा वाघमोडे,पोलीस अमोल जेवरे, आव्हाड हे सर्व त्या ठिकाणी आले.पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या समोरच हातातील धारदार शस्त्राने युवकावर हल्ला करुन भोकसले तर इतर साथीदारांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. 

हा सर्व प्रकार पोलीसांच्या समक्ष सुरु होता. मुस्लिम समाज सचटनेने जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर हुज्जत घालणारे यांचे सोनई परिसरात मटका व दारूचे अवैध धंदे असल्याने पोलीस त्यांच्या वर कारवाई करत नाही. आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ही घटना गंभीर आहे. यात पोलीस आरोपीला पाठीशी घालत आहेत. या गुन्ह्या मध्ये सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे पोलीस नाईक बाबा वाघमोडे, आव्हाड व इतर कर्मचारी यांच्या वरही गुन्हा दाखल करावा.

सदर घटनेचा तपास योग्य पध्दतीने व्हावा आपण स्वत: बारकाईने लक्ष घालुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.



close