एरंडोल प्रतिनिधी:- शहराची पर्यावरण गुणवत्ता व निसर्गाचा समतोल राखण्यास मदत व्हावी या दृष्टीने पर्यावरण पुरक इलेक्ट्रिक व्हेहीकल चे प्रदर्शन माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत दि.२८/१०/२०२१ रोजी पोलिस कवायत मैदान एरंडोल येथे एरंडोल नगर पालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासनाच्या ई-व्हेहीकल धोरण २०२१ नुसार राज्यात सन-२०२५ पर्यंत ई-व्हेहीकल चा हिस्सा वाढावा
यासाठी प्रयत्न केले जात आहे.सध्याच्या प्रचलित असणा-या पेट्रोल / डिझेल गाड्यांपेक्षा ई-व्हेहीकल
हा फ़ायदेशिर असा पर्याय उपलब्ध झाला असल्याने शासनाचा ई-व्हेहीकल वर जोर वाढला आहे.
ई-व्हेहीकल किमतीने कमी ,वजनाने हलकी, कमी खर्चात जास्त किमी चालणारी,जेष्ठ नागरीक व
महीला यांच्या साठी फायदेशीर आहे. तिन तासाच्या चार्जिंग मधे फ़क्त १.५ युनिट चा वापर करुन ६०
Km ची सरासरी मायलेज गाड्यांचे न्यु पार्वताबाई ई-बाईक सेवा एरंडोल यांच्या सहाय्याने प्रदर्शन
आयोजीत केले होते.प्रती किमी खर्च १० पैसे येत असल्याने स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे.
गुजरात मधील वार्ड विझार्ड या कंपनी मार्फत बनविण्यात आलेल्या जॉय ई-बाईक प्रदर्शनामधे ठेवण्यात आल्या
होत्या. प्रदर्शनाचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांनी केले तसेच प्रमुख पाहुणे
म्हणून तहसिलदार सुनीता चव्हाण ,पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव ,मुख्याधिकारी विकास नवाळे
तसेच सदस्य नगर पालिका एरंडोल उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ दाभाडे कार्यालय अधिक्षक हितेश जोगी,पाणी पुरवठा अभियंता प्रियंका जैन, डॉ.योगेश सुकटे,डॉ. अजित भट, अभियंता देवेन्द्र शिंदे, विकास पंचबुधे, विवेक कोळी,भुषन महाजन,लेखापाल विक्रम घुगे, शरद राजपुत,महेन्द्र पाटील ,दीपक गोसावी यांनी प्रदर्शनासाठी परिश्रम घेतले.
प्रदर्शनाच्या ठिकाणी भेट देत असलेल्या नागरीकांना नगरपालिकेतर्फे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते रोपांची भेट देण्यात आली.एका नागरीकाने प्रदर्शनाच्या ठिकाणी तात्काळ गाडी खरेदी केली.तसेच दिवाळी पुर्वी जे नागरीक ई-व्हेहीकल बुक करतील त्यांना सुट देण्यात येईल असे कंपणी मार्फत सांगण्यात आले. प्रमुख पाहुणे व शहरातील नागरीकांनी प्रदर्शनाचालाभ घेतला व प्रदर्शन ठिकाणी भेट दिल्याबद्दल नगर पालिकेतर्फे सर्वाचे आभार मानण्यात आले.

