हुतात्मा स्मारकाच्या विकासासाठी ५० लाखांचा निधी
अकोले । प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्हाचे पालक मंत्री ना.हसन मुश्रीफ हे अकोले दौऱ्यावर असताना धुमाळवाडी अकोले येथील असलेल्या हुतात्मा स्मारक स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यांच्यासोबत तालुक्याचे आमदार किरण लहामटे देखील उपस्थित होते. तसेच यावेळी अकोले तालुका माजी सैनिक संघांचे माजी सैनिक व सैनिक परिवार, धुमाळवाडी ग्रामपंचायत सरपंच डॉ. गोर्डे व त्यांचे सर्व सहकारी मोठया संख्येने हजर होते.
अकोले तालुका माजी सैनिक संघांचे अध्यक्ष सुभेदार भास्कर तळेकर, सरपंच डॉ.गोर्डे, पोलीस पाटील सौ. प्रणाली प्रशांत धुमाळ व सौ निताताई आवारी (उपाध्यक्ष - महिला जिल्हा राष्ट्रवादी) आदी मान्यवर उपस्थित होते,
यावेळी प्रशांत पा. धुमाळ यांच्याहस्ते पालकमंत्री मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हुतात्मा स्मारकाच्या विकास निधीसाठी निवेदन देण्यात आले, त्याची त्वरीत दखल घेऊन मंत्री महोदयांनी ५० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. त्याबद्दल अकोले तालुका माजी सैनिक संघ व धुमाळवाडी ग्रामपंचायततर्फे पालकमंत्र्यांचे आभार प्रकट करण्यात आले.

