shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

11 वर्षापासून मातंगवस्ती अंधारात... !!

वांबोरी । प्रतिनिधी :
सविस्तर वृत्त वांबोरी येथील राहुरी वेस भागातील पाण्याच्या टाकी जवळ 11 वर्षापूर्वी नवीन मातंगवस्ती अस्तित्वात आली परंतु हि वस्ती आजहि अंधारातच आहे मातंग समाज हा गेली अनेक वर्ष वेशीच्या बाहेर खितपत पडलेला आहे.याकडे गावातील कोणताहि नेता लक्ष देत नाही. 

आजूबाजूला पडीक शेत जमीनी त्यातच सापांचा रोजच सुळसुळाट अशा परिस्थितीत या वसाहतीत गेल्या 11 वर्षापासून एकहि पथदिवा नाहि, पथदिवे बसवावेत म्हणून या भागातील अनेक लोकांनी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिझवले तर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद ससाणे यांनी देखील अनेक वेळेस ग्रामसभेत याबद्दल आवाज उठवला. परंतु शेवटि निराशाच पदरात पडली म्हणून वांबोरीतील मातंगवस्ती हा भाग आदिवासी भाग म्हणून घोषित करण्यात यावा.

 यासाठी डॉ. अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानच्या वतीने मा. जिल्हा अधिकारी यांचेकडे लवकरच पाठपुरावा करणार आहोत असे सामाजिक कार्यकर्ते आणि डॉ. अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद ससाणे यांनी सांगितले.
close