धनञयोदशी निमित्ताने रिगल ग्रूप निमगाव केतकी यांचेवतीने मारूती महादेव मंदिरात दीपोत्सव साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:दि २ ऑक्टोबर रोजी दिवाळी सणाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे धनञयोदशी दिवशी रिगल ग्रूपच्यावतीने निमगाव केतकीचे ग्रामदैवत मारूती , महादेव मंदिरात शेकडो दिवे लावून दीपोत्सव साजरा केला.
रिगल ग्रूप विविध समाजोपयोगी शैक्षणिक , सामाजिक , धार्मिक उपक्रम राबवते. यामध्ये मतदार नोंदणी , मतदान जागृती , शैक्षणिक साहित्य वाटप , दीपोत्सव घेतले जातात.रिगल ग्रूप सलग सातव्या वर्षी दीपोत्सव साजरा केल्याबद्दल या उपक्रमाचे विशेष कौतुक करून सदस्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी निमगाव केतकी ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वडापूरे , सावता परिषदेचे राज्य संघटक संतोष राजगुरु , माजी सदस्य माणिक भोंग , तुषार खराडे , भुषण जौंजाळ , बापू आदलिंग , संतोष हेगडे उपस्थिती होते. दीपोत्सवाचे संयोजन रिगल ग्रूपचे राजू भोंग , अबादास जगताप , विशाल भोंग , अक्षय पाटील , तात्यासाहेब जगप , परेश महाजन उपस्थित होते.

