shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे कृनाल महाजन यांची बिनविरोध निवड...येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेच्या हाती सत्ता द्या शहरासाठी विकास कामाची गंगा आणणार- आमदार चिमणराव पाटील


प्रतिनिधी। एरंडोल प्रमोद चौधरी
एरंडोल :- येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे शहर प्रमुख कुणाल रमेश महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. एरंडोल नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष  आरती अतुल महाजन यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदाकरीता आज दि.०२/११/२०२१ रोजी दुपारी १२.०० वा. विशेष सभेचे आयोजन म. जिल्हाधिकारी जळगांव यांचे आदेशानुसार करण्यात आले होते.
 सभेचे पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार  सुचिता चव्हाण यांनी काम पाहिले दुपारी बारा वाजेपर्यंत एकमेव उमेदवार  कुणाल रमेश महाजन यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले असता उपाध्यक्ष पदाकरिता एकाच उमेदवाराचे दोन्ही अर्ज वैध असल्याने  कुणाल  महाजन यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. त्याकामी सुचिता चव्हाण पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार एरंडोल यांना मुख्याधिकारी  विकास नवाळे व कार्यालय अधिक्षक हितेश जोगी यांनी सहकार्य केले. त्यानंतर अध्यक्ष  रमेश परदेशी यांनी पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार यांचे नगरपालिकेच्या वतीने स्वागत केले व  सुचिता चव्हाण यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष  कुणाल  महाजन यांचे अभिनंदन केले या उपाध्यक्ष निवडीसाठी नगरसेविका छाया दाभाडे, प्रतिभा पाटील, जयश्री पाटील, आरती महाजन, दर्शना ठाकूर,  हर्षाली महाजन नगरसेवक नितीन महाजन   कुणाल  महाजन, डॉ. नरेंद्र ठाकूर  शेख जहिरोद्दीन कासम ,मोमीन अब्दुल शकूर अ. लतीफ,योगेश महाजन उपनगराध्यक्ष निवडीच्या मिटींगला उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष कुणाल महाजन यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार चिमणराव पाटील म्हणाले की गेल्या काही दिवसांपूर्वीच एरंडोल शहरासाठी ४ कोटी रुपये रस्त्याच्या कामाकरिता व ३ कोटी रुपये गाव ते पुरा भागात जोडणार्‍या फुलासाठी देण्यात आले आहेत. लवकरच या फुलाचे बांधकामाच्या शुभारंभ करण्यात येणार आहे. नगरपालिका निवडणुकीच्या आधी ८ ते १० कोटी रुपयांचे विकासकामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनाच्या हाती नगरपालिकेची सत्ता दिल्यास एरंडोल शहरामध्ये 300 कोटी रुपयांचे विकास कामांची घौडदौड सुरू करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख,वासुदेव पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, यांचेसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या छोटेखानी कार्यक्रमासाठी समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष शोभा महाजन, जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, माजी जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी प्रभारी सभापती अनिल महाजन युवा सेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील युवा सेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन, उपतालुका प्रमुख रवींद्र चौधरी, आनंदा चौधरी, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, किशोर निंबाळकर, उद्योगपती समाधान पाटील, नितीन बिर्ला, सुनील चौधरी, कुणाल पाटील, अमोल भावसार, आर डी पाटील, सुनील जोहरी,मोहन महाजन राजेंद्र महाजन यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
   
 दरम्यान उपनगराध्यक्षपदी कृनाल महाजन यांची निवड झाल्याबद्दल फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच आमदार चिमणराव पाटील नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष कुणाल महाजन व शिवसेना पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले.
    उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जबाबदारी वाढली असून शहरातील समस्या सोडवण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे कृनाल महाजन यांनी सांगितले. महाजन यांच्या निवडीबद्दल विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
.
close