shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तुमच्या त्या भावना घडवायच्या असतील तर दिल्लीला जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच बघू - हर्षवर्धन पाटील.हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथे माणिक मोबाईल शॉपी शाखा नंबर २७ चे उद्घाटन संपन्न.

तुमच्या त्या भावना घडवायच्या असतील तर दिल्लीला जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच बघू - हर्षवर्धन पाटील.

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथे माणिक मोबाईल शॉपी शाखा नंबर २७ चे उद्घाटन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: तुमच्या भावना घडवायच्या असतील तर दिल्लीला जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच बघू. येणाऱ्या भविष्य काळामध्ये असे वाटते की काय चांगले विषय निश्चित पणे  पुढे येतील आणि ते येत असताना विशालदादा तुमची चांगली मदत लागणार आहे. असे मत इंदापूर शहरातील बसस्थानक या ठिकाणच्या व्यापारी गाळ्यांमध्ये नव्याने उभारलेल्या अजय पवार यांनी उद्योजक शेखर उंद्रे यांच्या माणिक मोबाईल शॉपी शाखा नंबर २७ इंदापूरच्या दुकानाचे उद्घाटन माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते (दि.३१ ऑक्टोबर) रोजी करण्यात आला. त्यावेळी  उद्घाटनपर भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी  शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक  विशालदादा बोंद्रे यांनी व्यक्त केलेल्या भावनावर आभार मानत आपले मत व्यक्त केले.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे,  शिवसेना  पुणे जिल्हा समन्वयक  विशालदादा बोंद्रे, माजी इंदापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष शिवाजी मखरे, मनोहर चौधरी,  महादेव सोमवंशी, धनंजय पाटील ,रघुनाथ राऊत, शिवाजीराव इजगुडे, बापूराव जामदार, मेघश्याम पाटील ,कैलास कदम ,पांडुरंग शिंदे , अण्णासाहेब धोत्रे,विशाल चव्हाण ,विकास देवकर ,विठ्ठल कदम, शत्रुघ्न बागल, मच्छिंद्र शेटे, प्रकाश शिंदे, पांडुरंग शिर्के ,अनिल सय्यद, शिवाजी तरंगे ,सुरेश मेहर, कपिल पाटील, दिलीप कोरटकर, राकेश फडतरे ,बाळासाहेब मोरे, मिलिंद शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती इंदापूर शहरात येऊन व्यवसाय करायचे स्वप्न बाळगून अजय सुभाष पवार व विजय सुभाष पवार यांनी हा व्यवसाय उभारला आहे. याठिकाणी हा चांगला व्यवसाय उभारला याचा आम्हाला सर्वांना मनापासून आनंद आहे. मोबाईल ही प्रत्येकाची दैनंदिन गरज झालेली आहे,   विशालदादा बोंद्रे यांनी जी भावना व्यक्त केली त्याबद्दल आभार मानतो. तसेच ते पुढे म्हणाले की, तुमच्या  त्या भावना घडवायच्या असतील तर दिल्लीला जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच बघू, येणाऱ्या भविष्य काळामध्ये मला असे वाटते की काय चांगले विषय निश्चित पणाने पुढे येतील आणि ते येत असताना विशालदादा तुमची चांगली मदत लागणार आहे असं वाटतं . शेवटी कोणाला पद मिळाले तर तालुक्‍याच्या विकासाच्या दृष्टीने आणि आपल्या भागाच्या विकासाच्या दृष्टीने उपयोगाचे आहे. शेवटी सत्ता ही लोकांच्या कामासाठी असते ते काम तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या मागे लागून इंदापूर तालुक्याचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्न बाबतीत विकास कामे करावीत. तालुक्याचा विकास करायचा असेल तर निश्चित पणे आणि सर्वांनी एकत्र येऊन यापुढच्या कालखंडात काम करायचे आहे असे  मत व्यक्त केले.

यावेळी आप्पासाहेब जगदाळे आपल्या भाषणात म्हणाले की, आज शेतमजुरांच्या हातात सुद्धा मोबाईल आहे. साधा माणूस एखाद्या वेळी किराणा साहित्य घेणार नाही. परंतु मोबाईल बंद पडला तर चैन पडत नाही म्हणून कसंही करून तो मोबाईल घेऊन जाणारच. परंतु मोबाईल घेऊन जाताना तो रोखच घेऊन जातो. म्हणून हा रोख स्वरूपात चालणारा व्यवसाय आहे.

या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना  विशालदादा बोंद्रे म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांना अमित शहा साहेबांनी राज्यसभेवर घ्यावे आणि सहकार मंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात मध्ये घालावी म्हणजे आपल्या इंदापूर तालुक्यास विकास अगदी शंभरच्या  स्पीडने होईल. तसेच ते पुढे म्हणाले की ,शेती वरती अवलंबून असण्या पेक्षा व्यवसायामध्ये उतरले तर जास्त प्रगती होते. चव्हाण आणि पवार बंधूं जो मोबाईल विकणार आहे तो तुम्ही रिपेरिंग करणे गरजेचे आहे. व्यवसायामध्ये आपले पैसे बँकेत भरून आपली  क्रेडिट वाढवा म्हणजे बँकेकडून आपल्याला खेळते भांडवलासाठी पतपुरवठा मिळेल.

तसेच शिवाजी मखरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, हर्षवर्धन पाटील यांना केंद्रात नाही तर महाराष्ट्रात ठेवायचे कारण महाराष्ट्रातील सहकार चळवळ डबघाईला आली आहे .ती हर्षवर्धन पाटील यांच्या शिवाय त्याला ताकत मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून पाटील यांना महाराष्ट्रातच ठेवायचे आहे. येत्या विधानसभेला सर्वात जास्त मतांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रच्या विधानसभेवर पाठवून महाराष्ट्रातच मंत्री पद मिळवून द्यायचे आहे. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता अनेक आव्हानांना सामोरे जाऊन उद्योग धंद्यात उतरले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
close