shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नान्नज धुमाल येथे विहिरीत पडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू...!


संगमनेर । प्रतिनिधी(ऋषिकेश जगताप):-
संगमनेर तालुक्यातील नानज दुमाला येथे विहिरीतील पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत संगमनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करणयात आली आहे. 

संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारात शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सागर भास्कर कोळपे वय २२ असे विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुरुवारी सायंकाळी संगमनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सागर हा गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास शेतात कांद्याच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेला होता. शेतातील विहीरीवर विद्युत मोटार चालू करण्यसाठी गेला असता त्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने सागरचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर मृतदेह विहिरीतून काढण्यासाठी पाण्याचा उपसा करून काढण्यात आला. तब्बल सहा तासानंतर हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
close