शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१
श्रीरामपूर : गेल्या आठवड्यात श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील ओव्हरब्रिज वर दोन मोटरसायकलवर आलेल्या आरोपींनी सोयाबीन भरलेली पिकप गाडी आडून लुटली होती.तसेच चालक विनोद सावळे,राहणार- जिल्हा बुलढाणा यांच्याकडील साडेतीन हजार रुपये काढून घेतले होते.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी आरोपी दीपक ऊर्फ डॅनी बारसे,वय-33 व मनोज सोडणार,वय-22 ,दोघे राहणार -नांदूर,तालुका श्रीरामपूर यांना अटक केली आहे.त्यांच्याकडे पोलिसांनी तपास केला असता इतर तीन साथीदारांची नावे देखील त्यांनी सांगितले आहे.यावेळी चोरलेला 22 क्विंटल सोयाबीन मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला.
या गुन्ह्यातील आरोपींबद्दल कुठलीही ठोस माहिती नसताना तपास कौशल्याच्या आधारे व तांत्रिक माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे,डिवाइएसपी श्री.संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक श्री.संजय सानप,तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.मधुकर साळवे,तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री.समाधान सुरवाडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे,पोलीस शिपाई राहुल नरवाडे,गौतम लगड,रघुनाथ कारखेले व अपर पोलीस अधीक्षक कार्यालय,श्रीरामपूर सायबर सेल पथकाचे पोलीस नाईक फुरकान शेख,पोलीस शिपाई प्रमोद जाधव यांनी केली.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

