shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अजित दादा आले, उदघाटन करायचं तर त्याचवेळी मंत्री महोदयांच्या नावातील चूक पहिली, अन दिली ‘ही’ भन्नाट रिॲक्शन..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१
अहमदनगर (पारनेर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अनके किस्से व्हायरल होत असतात. बऱ्याचदा त्यांच्या अचानक आलेल्या रिऍक्शनची जास्तच चर्चा होते. दादा कधी काय बोलतील याचा नेम नाही. ते नेहमीच कर्तव्यदक्ष अन चाणाक्ष असतात.

त्यामुळे त्यांच्या नजरेतून कधी काही सुटत नाही. असाच एक अनुभव नुकताच अहमदनगरमधील पारनेर याठिकाणी आला.

पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याचा जिर्णोद्धाराचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी, जिर्णोद्धार वाड्याच्या कोनशिलेवरील नाव पहिले. याठिकाणी मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव चुकले होते.

हे पाहून त्यांनी अक्षरशः कपाळावर हात मारून घेतला. त्यांच्या या रिऍक्शनने सगळेच हसायला लागले.
यावेळी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आ. निलेश लंके, चैतन्य महाराज देगलुरकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित होते.
एखाद्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री येत आहेत, म्हटल्यावर तेथे निटनिटकेपणा आणि टापटीपपणा असतोच. मंत्रीमहोदयांना कुठलिही बोलण्याची किंवा चुका काढण्याची संधी न देण्याचा प्रयत्न असतो.

संत निळोबाराय यांचे निवासस्थान असलेला वाडा आणि मंदिर यांच्या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अजित पवारांनी उद्घाटन केल्यानंतर कोनशिलेवरील नावात असलेली चूक लक्षात आणून दिली.
कोनशिलेवर अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफऐवजी ‘मुस्त्रीफ’ अशी शब्दरचना करण्यात आली होती. हे पाहिल्यानंतर, अजित पवारांनी कपाळावर हात मारला.
त्यानंतर प्रथम सर्वच चारले. त्यांत एकच हशा पिकला
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close