शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१
अहमदनगर : चारित्र्यावर संशय घेणार्या सासर्याचा सूनेनेच खून केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील शिवारात मंगळवारी सकाळी घडली.
अर्जुन गोविंद हजारे (वय 62 रा. चिचोंडी पाटील) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची सून ज्योती अतुल हजारे (रा. चिंचोडी पाटील) हिच्याविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी बाबासाहेब चंदु बनकर (वय 42 रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. अर्जुन हजारे हा सून ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून मंगळवारी सकाळी त्यांच्यात भांडण झाले. भाऊ गुजाबा हजारे यांच्या घरासमोरील रस्त्यावर हे भांडण सुरू होते. या भांडणामध्ये ज्योती हिने अर्जुन हजारे यांच्या डोक्यात, कपाळावर, तोंडावर दगड व कुर्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अर्जुन हजारे यांचा मृत्यू झाला आहे.
शवविच्छेदनसाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, बोराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी ज्योती हजारे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोराडे करीत आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

