shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंचनामा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यास निलंबित करा..!!

 पंचनामा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यास निलंबित करा!! 


: रिपाइंची तहसीलदारकडे मागणी!! 

-----------------------------------------------------

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

केज तालुक्यातील साळेगाव येथील मुरुमाचे उत्खनन केल्या प्रकरणी पंचनामा करून अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे.


या बाबतची माहिती अशी की, रिपाइंचे जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड यांनी दि. १७ ऑगस्ट रोजी तहसीलदार केज यांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी अशी मागणी केली आहे की, साळेगाव ता. केज येथे सर्व्हे नं./गट नं. ४० व ४२ मध्ये संतोष मेडकर यांनी ती जमीन स्वतःच्या मालकीची आहे; असे भासवून त्यातील मुरुमाचे उत्खनन करून मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रुक्चर कंपनी लिमिटेड यांना विकला आहे. खोदकाम करताना त्यांनी सुमारे १५ ते २० फूट खोल खोदकाम केले असल्याने त्यांचे सुमारे २५ लाख रु. चे नुकसान झाले असल्याचा उल्लेख रवींद्र जोगदंड यांनी तक्रारीत केलेला आहे. 

रवींद्र जोगदंड यांच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी तहसीलदारांनी मंडळ अधिकारी यांना दि. ३० ऑगस्ट रोजी पत्र क्र.२०२१/गौख/अवैध /कावि-३७८/१४३३ द्वारे पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु सुमारे अडीच महिन्याचा कालावधी उलटूनही मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला नाही. म्हणून रिपाइंचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांनी दि. २३ नोव्हेंबर मंगळवार रोजी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वरिष्ठांच्या आदेशांचे अवमूल्यन करून कर्तव्यात कसूर करीत उत्खनन करणाऱ्या कंपनीस सहकार्य जरणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करावी. या प्रकरणी संतोष मेडकर व मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड यांच्यावर मागासवर्गीय शेतकऱ्यांच नुकसान केले; म्हणून अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधित कायद्या नुसार कार्यवाही करावी. 

निवेदनावर तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांच्यासह जिल्हासल्लागार उत्तम मस्के, जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, राहुल सरवदे, दिलीप बनसोडे, रमेश निशिंगध, विकास आरकडे आणि गौतम बचुटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

close