शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१
पारनेर :आमदार नीलेश लंके तुम्ही आर. आर. पाटलासारखे महाराष्ट्रात काम करा. त्यांच्यासारखे व्हा, परंतु आपले अंथरूण, पांघरूण सांभाळा, असा वडिलकीचा सल्ला देत ज्येष्ठ नेते माजी आ. नंदकुमार झावरे यांनी आ. लंके यांना लोकसभा निवडणूक न लढविण्याचे सांगितले. आ. लंके यांना लोकसभेसाठी प्रोजेक्ट करण्याचे एकीकडे राष्ट्रवादीचे प्रयत्न असतानाच दुसरीकडे लंके यांना पारनेरमध्ये साथ देणारे ज्येष्ठ नेते झावरे यांनी वेगळ्या शब्दात कान फुंकल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.
टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर महाविद्यालयाच्या 20 लाख रुपये खर्चाच्या रस्ता कामाचा प्रारंभ आ. लंके व माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आला.ज्येष्ठ नेते माजी आ. नंदकुमार झावरे म्हणाले, पारनेर विधानसभा मतदारसंघात आ. लंके यांचे चांगले काम आहे. त्यामुळे आ. लंके यांनी वरच्या (लोकसभा) निवडणुकीचा विचार करू नये. तालुक्यातील जनतेला व प्रश्नांना जर न्याय द्यायचा असेल तर तालुक्यातच काम करा. पारनेर तालुक्यातून मोठे राजकीय भवितव्य आहे. आर. आर. पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून काम केले पाहिजे. आ. लंके यांचे कोरोना काळातील आदर्श काम महारास्त्रासह जगाने पाहिले आहे्.त्यामुळे त्यांच्या कामांसाठी कुणाच्या साक्षीची गरज नाही. त्यांचे काम देशात पोहचले आहे. मान खाली घालून ते ऐकून घेतात. त्यांच्यातील नम्रपणा त्यातून दिसून येतो. तालुक्यातील जनतेने 61 हजार मतांनी निवडून दिले आहे, जनतेचा कौल मान्य करा, असेही माजी आमदार झावरे म्हणाले.आ. लंके यांना म्हणाले,
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिवंगत शंकरराव काळे व सॉलिसीटर गुलाबराव शेळके यांनी तालुक्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले. त्यानंतर सर्वात जास्त शिक्षकांना तालुक्यात व जिल्हात रोजगार उपलब्ध करून देणारी जिल्हा मराठा शिक्षण संस्था आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजु आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम जिल्हा मराठा शिक्षण संस्थेने केले. गुणवत्ता व दर्जा टिकवून शिक्षणाची दारे खुली केली असे झावरे म्हणाले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

